आरोग्य व शिक्षण

फॉरेशिया फाऊंडेशनच्या सहकार्याने मळवली येथे पहिल्या सायन्स लॅबचे उदघाटन

Spread the love

मळवली : येथे श्री बर्ट्रँड फिग्युरस – एमडी इंडिया – फौरेशिया फाउंडेशन आणि डॉ.भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे यांच्या हस्ते दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, मळवली येथे विज्ञान, संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.

फोरेशिया फाउंडेशनद्वारे ग्रामीण भागातील मुलांमध्ये विज्ञान शिक्षण सुलभ करण्यासाठी सहकार्य केले जाते. श्री बर्ट्रँड फिगुएरास उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांची नवीन प्रयोगशाळा सर्व आधुनिक उपकरणासह, ग्रंथालय आणि संगणक प्रयोगशाळेमुळे परिसरातील मुलांना अगदी हाकेच्या अंतरावर विज्ञानाचे शिक्षण मिळणार आहे.

मळवली (मावळ) आसपासच्या 16 गावातील मुले संपर्क लिली इंग्लिश मीडियम स्कूल आणि जूनियर कॉलेजमध्ये शिकतात. या परिसरातील मुले आता 11 वी आणि 12 वी मध्ये विज्ञान शिक्षण घेऊ शकणार आहे.

फौरेशिया फाउंडेशनचे सीईओ श्री पॅट्रिक कोल्लर आणि फौरेशिया फाउंडेशनच्या संचालिका सुश्री इसाबेल कॉर्नू यांनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात फौरेशिया फाउंडेशन आणि संपर्क संस्थेच्या मदतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांचे नेहमीच प्रोत्साहन व सहकार्य राहील याची शाश्वती दिली.

उदघाटन प्रसंगी श्री पवन जयप्रकाश, एचआर इंडियाचे संचालक, श्री मनीष पाटील, अभियांत्रिकी संचालक, श्री समीर पागे, मानव संसाधन उपसंचालक, श्रीमती दामिनी चौधरी, सुश्री पूनम आणि सुश्री प्राजक्ता यांनी फौरेशिया इंडिया प्रा. लि. यांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्क संस्थेच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच कातकरी कुटुंबांना किराणा बास्केटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या आभारपर निवेदनात संपर्क संस्थेचे संस्थापक व संचालक श्री. अमितकुमार बॅनर्जी यांनी “फॉरेशिया फाउंडेशने केलेल्या मदतीमुळे परिसरातील मुलांना विज्ञान शिक्षणासोबतच नवनवीन संधी उपलब्ध होतील असे म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!