ताज्या घडामोडी

ज्ञानदान शिक्षण संस्था संचलित मम्मा प्री स्कूल नेर्ले मध्ये “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांची जयंती मोठ्या उत्साहात

Spread the love

नेर्ले (ता.वाळवा)

येथे ज्ञानदान शिक्षण संस्था संचलित मम्मा प्री स्कूल नेर्ले मध्ये आज 3 जानेवारी 2022 रोजी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांची जयंती मोठ्या उत्साहात यावेळी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मम्मा प्रि स्कूलमध्ये ‘वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे हर्ष अकॅडमी इस्लामपूर चे संस्थापक मा. रवी बावडेकर (सर) हे उपस्थित होते.

त्याच बरोबर या वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विक्रम हावळे (सर) उपस्थित होते. व या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक संदीप मोहिते (सर) होते .सदरच्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना सावित्रीबाई फुले यांचे विचार समजावेत व या विचारांचा वसा आणि वारसा स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी जोपासून अंगीकार करावा , या उद्देशाने आज मम्मा प्रि स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला काही विद्यार्थ्यांनी इंग्लिश मध्ये भाषण केले तर काहींनी हिंदी व मराठी मध्ये भाषण केले त्यामुळे या स्पर्धेमध्ये जास्त चुरस निर्माण झाली. प्रमुख पाहुणे रवी बावडेकर (सर) बोलत असताना विद्यार्थ्यांची संवाद साधल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीज्योती कशा घडल्या याबद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहून रवी बावडेकर (सर) यांनाही कुतूहल निर्माण झाले. परीक्षक म्हणून विक्रम हावळे (सर) होते त्यांनीही विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली. तर संदीप मोहिते (सर) यांनीही सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. या वक्तृत्व स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी स्कूलच्या शिक्षिका प्राजक्ता पाटील (मॅडम) श्रद्धा जाधव (मॅडम) व वर्षाराणी वेटम (मॅडम) यांनी चांगल्या पद्धतीने करून घेतली. व त्यांना मार्गदर्शन स्कूलच्या प्रिन्सिपल दर्शू जगताप (मॅडम) यांनी केले. त्यामुळे हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!