ताज्या घडामोडी

वाटद कवठेवाडी शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Spread the love

वाटद कवठेवाडी शाळेत जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियानास सुरुवात

खंडाळा : रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेत महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निर्गमित निर्णयानुसार जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान या अभियानास शिक्षणाच्या प्रणेत्या तथा आधुनिक शिक्षणतज्ज्ञ सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुरुवात झाली.
या अभियानाच्या अनुषंगाने शाळेत पहिल्याच दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेल्या शाळेतील मुलींनी यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्र गाण्यांच्या माध्यमातून आणि भाषणाद्वारे उपस्थितांसमोर सादर केले.त्यामध्ये गौरी संदीप धनावडे, प्रांजल कुर्टे, श्रावणी घवाळी, गौरी तांबटकर, सोहम कुर्टे, सृष्टी तांबटकर, नयन बारगुडे, नियती धनावडे, आर्यन तांबटकर यांच्यासह विद्यार्थ्यांनी गाणी, कविता, भाषणे सादर केली.
त्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे विश्वनाथ शिर्के यांनी सावित्रीचा वसा आणि त्यांनी दिलेल्या विचारांचा वारसा आजच्या समाजाने जपणे आवश्यक असून सर्वांनीच यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास बारगुडे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या अभियानाचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक शाळेचे शिक्षक गोविंद डुमनर यांनी केले. प्रास्ताविकामधून त्यांनी जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राचा अभियान या अभियानाची माहिती व उपयुक्तता सांगत या अभियानादरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ नारायण तथा भाऊ धनावडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळझोंडी नंबर एकचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शितप, सामाजिक कार्यकर्ते उदय महाकाळ, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे प्रमुख संतोष भरणे, सामजिक कार्यकर्ते संदीप पवार, मानवी तांबटकर पार्वती धनावडे, अक्षरा शिर्के, सुजाता लोहार, समीक्षा घवाळी, माधव अंकलगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!