ताज्या घडामोडी

शिव केदार विद्यालयातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण

Spread the love

अशोक जाधव

शासनाच्या आदेशानुसार शिराळा तालुक्यातील कांदे येथील शिव केदार विद्यालयात १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.
सन २००७ वा त्यापुर्वी जन्म वर्ष असलेल्या लाभार्थ्यांनाच लसीकरण करण्यात येणार आहे.
१५ ते १८ वयाच्या लाभार्थ्यांना कोविन सिस्टीमवर स्वतःच्या मोबाइल नंबरव्दारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल ही ऑनलाईन सुविधा १ जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे.
या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड १९ वर्किंग ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अॅडव्हायइरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन यांनी केवळ ‘कोव्हॅक्सिन’ लस वापराबाबत सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार विद्यार्थ्याना लसीकरण करण्यात आले. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कांदे येथील डाॅ.श्री सुशांत कांबळे, सौ श्वेता पवार मॅडम, सौ लोहार मॅडम सर्व आशा सेविका यांनी परिश्रम घेतले यावेळी शिव केदार विद्यालय, कांदेचे शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!