आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

Spread the love

रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

  आवाज न्यूज पवनानगर प्रतिनीधी: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त पवनानगर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. आज गुरुवार (दि. १६) ती मावळ तालुका आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव च्या वतीने संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर येथील ग्रार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. मात्र कालपासून राज्यभरासह मावळ तालुक्यातील शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये ढोलताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढत व विविध उपक्रम राबवत प्रवेशोस्तव साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मावळ तालुका आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शैक्षणिक साहित्य वाटप केले.

सोनवणे, उत्तम चव्हाण, संदीप सोनवणे, मोहन सोनवणे, शक्ती जव्हेरी, मंगेश कदम, प्रतीक भालेराव, मुख्याध्यापक राहुल सोनवणे, बाळू कदम, नीता कालेकर, सोनल गांधी, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर प्रियंका येवले आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!