ताज्या घडामोडी

अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना ओंजळ बहुउद्देशीय संस्थेतर्फे श्रद्धांजली अर्पण

Spread the love

अनाथांसाठी सेवा कार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्या 74 वर्षांच्या होत्या, महिन्याभरापूर्वी त्यांचे ऑपरेशन झाले होते ,त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माया हरवली आहे.

 

ओंजळ बहुउद्देशीय संस्थेतर्फे सुद्धा त्यांच्या मुलांसोबत हार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.
श्रद्धांजली अर्पण करताना अतिशय भाऊक असा क्षण होता.सिंधुताई सपकाळ फक्त अनाथांच्या आई नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या माई होत्या.ओंजळ बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कु.प्राजक्ता मुते यांनी मुलाना सिंधुताई सपकाळ यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगून महाराष्ट्राला अशी माई होणार नाही असे संबोधित केले.
अनुषंगाने आज श्रद्धांजली अर्पण करून पसायदान व मोंन अर्पण केले.यावेळी सारंग भोयर, सारंग नेवारे, यांनीसुद्धा माय बद्दल आपले मत व्यक्त केले.ओंजळ संस्थेचे पदाधिकारी व संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी श्रद्धा लुंगे येरावार , दीप्ती चव्हाण अरशिया बेग, तन्वी ठोंबरे, तनवी वीलायतकर ,
सौरभ श्रीवास्तव निखिल कुमरे, आलो भारोटे, नंदिनी महल्ले, नंदिनी आपुलकर, आदित्य यूनाते ,इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!