ताज्या घडामोडी

जांभळेवाडी,चिखलवाडी,लादेवाडी येथील विकास कामांचा शुभारंभ.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

तालुक्यातील जांभळेवाडी येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, चिखलवाडी येथे पवार वस्तीकडे जाणार रास्ता डांबरीकरण आणि लादेवाडी येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे या आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) यांनी २५/१५ योजनेतून दिलेल्या प्रत्येकी १० लाख रुपये असा एकत्रितपणे ३० लाख रुपये किमतीच्या कामाचा शुभारंभ झाला. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विश्वास कारखाण्याचे संचालक यशवंत निकम, स्थानिक पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!