ताज्या घडामोडी

डॉ. नानासाहेब मयेकर स्मृतिदिनी चाफे महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love

जाकादेवी /संतोष पवार
रत्नागिरी तालुक्यातील डॉ. नानासाहेब मयेकर फाऊंडेशन मालगुंड,तसेच मोहिनी मुरारी शिक्षण संस्था, मालगुंड एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे संस्थापक व माजी कार्याध्यक्ष कै. डॉ. नानासाहेब मयेकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा.मयेकर चाफे महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे. डॉ. नानासाहेब मयेकर यांनी उचित ध्येय नजरेसमोर ठेवून अतिशय निष्ठेने,त्यागी वृत्तीने अविरतपणे शिक्षणासाठी व समाजासाठी केलेल्या धडपडीचे,कार्याचे स्मरण करून त्यांच्या स्मृतींना ,कार्याला शिक्षण संस्थेच्यावतीने अभिवादन करण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी कै. डॉ.नानासाहेब मयेकर यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या स्पर्धा पुढील प्रमाणे- माझा आवडता नेता माझा, आवडता खेळ ,कुटुंब राष्ट्र निसर्ग या विषयावर प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक स्तरावर भाषण स्पर्धा तसेच गौरव समारंभ, बक्षीस समारंभ ,मित्राचा वाढदिवस,खेळाडूंचा सत्कार,काव्यवाचन समारंभ ,जिल्हाधिकारी यांचा सत्कार सोहळा ,निरोप समारंभ ,क्रीडा स्पर्धा समारंभ अशा विषयांवर तिन्ही गटात सूत्रसंचालन स्पर्धा ,तसेच माझे आवडते पुस्तक या विषयावर पुस्तक परीक्षण स्पर्धा, प्राथमिक गटात हस्ताक्षर स्पर्धा याशिवाय व्यसनमुक्ती, लोकसंख्यावाढ, प्रदुषण, लोककला या विषयावर व्यंगचित्र स्पर्धा ,तर तिन्ही गटांसाठी हार्मोनियम, तबला, पखवाज वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .या स्पर्धेत मालगुंड,जाकादेवी,काजुर्ली,चाफे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धांना विद्यार्थी, शिक्षक,परीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,शिक्षणप्रेमी नागरिक, हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.नानासाहेब मयेकर फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष व युवा नेते रोहित मयेकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!