ताज्या घडामोडी

चेंबूरमधील किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी

Spread the love

नगरसेविका आशा मराठेंनीम हापौरांना पाठवले पत्र

मुंबई – चेंबूर परिसरात किशोरवयीन मुलांसाठी एकही कोरोना लसीकरण केंद्र नसल्याने अशी हजारो मुले लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर परिसरात किशोरवयीन मुलांसाठी लसीकरण केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक १५२ च्या भाजपा नगरसेविका आशाताई मराठे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे एका लेखी पत्र पाठवून केली आहे.

मुंबई महापालिकेने ३ जानेवारीपासून शहरामध्ये ९ ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.मात्र पूर्व उपनगरातील मोठी लोकवस्ती असलेल्या चेंबूर परिसरात एकही लसीकरण केंद्र नसल्याने अशा मुलांची फार मोठी अडचण निर्माण झाली असून ही मुले लसीकरणासाठी इतर ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक मुले लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली झाल्याने चेंबूर परिसरात १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र उभारून त्याठिकाणी तज्ञ डॉक्टरांचे पथक उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी भाजप नगरसेविका आशाताई मराठे यांनी आपल्या या पत्रातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!