ताज्या घडामोडी

पहीला कोरोना… आता ओमिक्राॅनमुळे हाॅटेल व्यवसाय अडचणीत

Spread the love

कोकरुड/ प्रतापराव शिंदे
शिराळा तालुक्यातील मिनी कोकण आणि निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांना कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होते.मात्र गेली चार महिने कोरोना महामारी निवळताच चांदोली चे पर्यटन सुरू झाले होते. यामुळे लॉकडाउन मुळे आलेला थकवा घालवण्यासाठी व निसर्ग पर्यटणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक चांदोली कडे पुन्हा वळल्याने चांदोली परिसर पर्यटकांनी गजबजु लागला होता . या परिसरात चांदोली धरण ,सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, गुढे पाचगणी पठार,उदगिरीचे पठार ही येथील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. जाधववाडी येथील कलात्मक पद्धतीने उभारलेल्या ‘ चांदोली रिसॉर्ट ‘ मध्ये राहण्यासाठी आणि अविट चविमुळे जेवणासाठी पर्यटक येत आहेत . सध्या चांदोली अभयारण्यात शेकडो प्रकारच्या वनस्पती,रान फुले , सकाळच्या वेळी ऊनात येणारे रानटी पशु,पक्षी , जंगलातील विविध पक्षांचा किलबिलाट सुरू आहे.ईतर दिवसाच्या तुलनेत शनिवारी व रविवारी पर्यटकांची संख्या अधिक आहे. प्रकल्प क्षेत्रात बिबट्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रकल्प क्षेत्राची सैर करणाऱ्या पर्यटकांना त्याचे दर्शन होऊ लागले आहे.पर्यटकांची संख्या वाढू लागल्यामुळे येथील स्थानिक लघुउद्योगांना चालना मिळू लागली होती. मात्र ओमिक्राॅन हा विषाणू नव्याने शिरगाव करु लागल्याने प्रशासनाने नव्या विषाणूचा प्रसार वाढू नये म्हणूून अनेक निर्बंध घातले आहेत. यामुळे येथील परिसरातील युवकांनी बॅंकेची कर्जे काढून उभारलेला हाॅटेल , रिसॉर्ट व इतर व्यवसायिकांना पुन्हा एकदा आथिॅक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरी प्रशासनाने चांदोली येथील हाॅटेल व रिसॉर्ट फक्त बाहूरुन येणाऱ्या पर्यटकांच्या वर अवलंबून आहे. पर्यटक नसतील तर हा व्यवसाय चालत नाही.म्हणुन येथिल व्यवसायिकांचा विचार करावा अशी मागणी येथील हाॅटेल चांदोली रिसॉर्ट चे मालक सुनिल चव्हाण यांनी केली आहे.

 

⤴️ प्रकाश पिसे- पर्यटक- कोल्हापूर
बाईट:. सुनिल चव्हाण- मालक चांदोली रिसॉर्ट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!