ताज्या घडामोडी

कंत्राटी कामगाराची अवहेलना कधी थांबणार ?

Spread the love

आजच्या संगणक युगात धावत्या स्पर्धेला सामोरे जाणे व टिकूण राहणे फार जिकरीचे झाले आहे. आज प्रत्येक जण जिंकण्याच्या आशेने आपली इच्छा दुस-यावर लादण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे. आजची तरुणाई ही सुशिक्षित असून नवी आव्हाने पेलण्याचे ताकद त्यांच्या अंगी आहे. परंतु त्यांना साजेसे रोजगाराचे साधन मिळत नाही. म्हणून आपले शिक्षण, आवड,स्वाभिमान हे सर्व बाजूला ठेवून पडेल ते काम मिळेल त्या रोजगारावर करावे लागत असून, त्यांना हे स करायला भाग पाडले जात आहे.
आज कोणत्याही शासकीय कार्यालयात कामाचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी व कमीत कमी मोबदल्यात ठेकेदारी तत्वावर कर्मचा-यांची भरती केले जाते. वेतन जरी भिन्न असले तरी काम मात्र पूर्ण वेळ कर्मचा-यांसारखेच करावे लागते. समान काम समान वेतन कागदी घोड्यावरच शोभून दिसते. आयुष्याची उमेदीची वर्षे कंत्राटी कामगार म्हणून घालवणारी तरूण सुशिक्षित बेरोजगार दिशाहीन झाल्याचे सध्याचे चित्र आहे. या तरूणपिढीसमोर मोठया शव-तींचे दास होण्यापलीकडे आपले हव-क, अधिकार जाणून सक्षम होण्याचा मार्ग दाखविणारा कोणीही गाँडफादर मिळालेला दिसत नाही. केवळ ५ ते ७ हजार इतव-या तुटपुंज्या वेतनावर वेठबिगाराप्रमाणे राबविले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!