ताज्या घडामोडी

शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा कार्यक्रम- श्री.प्रकाशभाउ साबळे

Spread the love

शनिवार दि. ८ जानेवारी २०२२ रोजी पंचायत समिती अमरावती अंर्तगत नांदुरा बु केंद्राचे शैक्षणिक चर्चा सत्र व निरोप समारंभ तथा गुणगौरव कार्यक्रम Edify English School, कठोरा बु येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री. प्रकाशभाउ साबळे, सदस्य जि.प. अमरावती यांनी कार्यक्रमाबद्यल आपल्या भावना व्यक्त करतांना म्हणाले की, अशा कार्यक्रमामुळे शिक्षकांचे मनोबल वाढते व शिक्षण क्षेत्राला एक दिशा मिळते.
नांदुरा बु केंद्राचे शैक्षणिक चर्चा सत्र व सेवानिवृत्त शिक्षक श्री. अरविंद महल्ले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री. गौतम विरघट यांची पदोन्नती पंचायत समिती धारणी येथे झाल्यामुळे त्यांना निरोप तथा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे, यांचे मार्फत घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेमधे जिल्ह्यामधुन दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्यल सौ. वनिता अरुण बोरोडे (जावरकर ) विषय शिक्षिका यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती छाया घाडगे, गटशिक्षणाधिकारी पं.स. अमरावती, श्री.विलास वैद्य, विस्तार अधिकारी, श्री. अशोक इंगोले, विस्तार अधिकारी, श्री. साहेबराव कुरळकर , सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, श्री. अनिल डाखोरे,केंद्र प्रमुख, श्री.विलास बाबरे, केंद्र प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाबद्यल मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर सत्कार मुर्तीनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सुरेंद्र मेटे यांनी केले .सुत्रसंचलन सुवर्णा ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आशिष पांडे यांनी केले.
कार्यक्रमाला नांदुरा बु केंद्रातील सर्व मुख्याद्यापक, विषय शिक्षक व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता. श्री. राजेंद्र दिक्षित, श्री. संजय बाबरे, श्री. स्वप्नील मोहोड, श्रीमती विद्या शिरसाट, श्रीमती सुवर्णा ठाकरे , अर्पणा सोनटक्के , डॉ. आशिष पांडे तथा सर्व मुख्याद्यापक व सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!