ताज्या घडामोडी

माधवराव पाटील महाविद्यालयात मतदान दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Spread the love

मुरुम, ता. उमरगा, ता. ११ (प्रतिनिधी)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्नित श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या पत्रानुसार ८ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदान दिनाचे औचित्य साधून मतदान साक्षरता अभियान या निमित्ताने महाविद्यालयात सोमवारी (ता. १०) रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य रांगोळीच्या स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. महेश मोटे, आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. किरण राजपूत, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रवि आळंगे, प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ. संध्या डांगे, डॉ. राजू शेख, प्रा. नाना बेंडकाळे, विद्यार्थीनी प्रतिनिधी लता कांबळे, परमेश्वर मंडले आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोनाली जाधव, अंजिता ब्याळीकुळे, आरती गुंडगुळे, मोनिका बिराजदार, अंजीवनी स्वामी, आयशा इनामदार, अमोल कटके, पुजा शिंदे, सोनू चव्हाण आदींनी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!