ताज्या घडामोडी

रिफ्लेक्टर नसलेल्या ऊसाच्या ट्रेलरला धडकून तरुण जखमी

Spread the love

बोरपाडळे गावच्या कमानीजवळ थांबलेल्या ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्यामुळे सुशांत एकनाथ अडविलकर वय 20 रा.मोहरे हा तरुण जखमी झाला.त्याच्या छातीला मार लागला होता.
सुशांत हा आपल्या मोटरसायकलवरुन मोहरे येथे घरी जात असताना बोरपाडळे गावच्या कमानीजवळ उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रेलरला पाठीमागून धडकला. रिफ्लेक्टर नसल्यामुळे अंधारात हा ट्रेलर दिसला नाही.जोतिबा येथील 108 रुग्णवाहिकेतून जखमीस कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रस्त्यावर उभ्या केलेल्या ऊसाच्या ट्रेलरला रिफ्लेक्टर नसल्यामुळे अंधारात ट्रेलरन दिसल्यामुळे अपघात होत आहेत.एक सामाजिक जबाबदारी म्हणून ट्रॅक्टर मालकांनी ट्रेलरला रिफ्लेक्टर लावणं गरजेचं आहे.

डॉ.अभिजीत जाधव
अध्यक्ष
रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!