ताज्या घडामोडी

धनगर समाजाने मतभेद बाजूला सारून एकत्र यावे: साहित्यिक मा. धनंजय धुरगुडे 

Spread the love

धनगर प्राध्यापक महासंघ आयोजित
व्याख्यानमालेच्या निमित्ताने आवाहन

समाज प्रबोधनाची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी धनगर प्राध्यापक महासंघ, महाराष्ट्र राज्य कडून समाज बांधवांचे उदबोधन व प्रबोधनासाठी नामवंत साहित्यिक, अभ्यासक, संशोधक यांचे वैचारिक विवेचन व सुसंवादाचे आयोजन आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 6:00 वाजता केले जात आहे. धनगर प्राध्यापक महासंघ (म.रा.) महिला आघाडी आयोजित *समाज जागृती* उपक्रमात *लेखकांच्या दृष्टिकोणातून धनगर समाज* या विषयावर दि. 13/01/2022 गुरूवार रोजी सायंकाळी सहा वाजता *धनगरवाडा* या आत्मकथनात्मक कादंबरीचे लेखक *मा. प्रा. धनंजय धुरगुडे* यांनी समाज बांधवांशी संवाद साधला.
या समाजप्रबोधनपर व्याख्यान मालेत आपले विचार व्यक्त करतांना साहित्यिक मा. धनंजय धुरगुडे यांनी धनगर समाजाचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यावर सूचक भाष्य केले. प्राप्त परिस्थितीत संघर्ष करत आपल्याला जर प्रगती करत पुढे जायचं असेल तर आपल्याला एकजुटीने संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. आपापसातील मतभेद विसरून भाऊबंदकीतील वाद मिटवून सर्व समाज बांधवांनी आता खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज आहे, असे स्पष्ट विचार त्यांनी या व्याख्यानमालेच्या निमित्ताने व्यक्त केले. प्रत्येक गावात धनगर समाज गटातटात विखुरला आहे. अंतर्गत हेवेदावे या समाजात खूप असतात. धनगर समाज साधाभोळा, निरक्षर व अज्ञानी असल्याने प्रस्थापित त्याचा गैरफायदा घेऊन समाजात गट-तट पाडून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेतात. त्यामुळेच समाजाने सजग राहणे गरजेचे आहे, असं परखड मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. समाजातील उच्च शिक्षित कालांतराने आर्थिक सुबत्ता आल्यावर समाजाला तसेच प्रसंगी कुटुंबालासुध्दा विसरतात, असं मत प्रा. धुरगुडे यांनी धनगर समाजातील काही ज्वलंत दाखले देत व्यक्त केले. यावेळी, लेखक-वक्त्यांना अनेक श्रोत्यांनी प्रश्न विचारले व वक्ते प्रा. धुरगुडे यांनी समर्पक उत्तरे दिली. चर्चेमध्ये कृषी शास्त्रज्ञ डॉ. शिवाजीराव ठोंबरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, प्रा. डॉ. सतीश लवटे, लेखक गोविंद काळे, इ. मान्यवरांनी सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणे येथे कार्यरत असलेल्या *प्रा. विजया हाके* या होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर प्राध्यापक महासंघ, सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा *प्रा. डॉ. विजया पिंजारी* यांनी केले, तर प्रमुख वक्त्यांचा परिचय धनगर प्राध्यापक महासंघ कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्या *प्रा. डॉ. शशिकला सरगर* यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनगर प्राध्यापक महासंघाच्या पुणे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा *प्रा. डॉ.रत्नमाला वाघमोडे* यांनी केले, तर आभार प्रदर्शन धनगर प्राध्यापक महासंघाच्या धुळे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा *प्रा. डॉ.कल्पना घोलप* यांनी केले.
या ऑनलाईन व्याख्यानमालेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन धनगर प्राध्यापक महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शिरसाठ, महिला आघाडीच्या सन्माननीय अध्यक्षा, प्रा. डॉ. संगीता चित्रकोटी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानदेव काळे, सचिव प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी, सहसचिव प्राचार्या संगीता पुंडे व‌ प्रा. डॉ. धनराज धनगर व धनगर प्राध्यापक महासंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

प्रा. डॉ. अतुल संतोष सुर्यवंशी
सचिव
धनगर प्राध्यापक महासंघ (म. रा.)
मो. 9823197358

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!