ताज्या घडामोडी

डॉ.एस.एन.पाटील यांनी प्रामाणिकपणे चाळीस वर्षे वैद्यकीय सेवेचा वसा जपला: आ.मानसिंगराव नाईक

Spread the love

कोकरुड /वार्ताहर
कोकरूड येथील डॉ. एस. एन पाटील (कोतोलीकर) यांनी गेली चाळीस वर्षे वैद्यकीय सेवेचा वसा प्रमाणिकपणे जपला असल्याचे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. ते कोकरूड ता. शिराळा येथील धन्वंतरी हाॅस्पिटलच्या केरळीय पंचकर्म व सर्जिकल आय. सी. यु. विभागाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. विनयरावजी कोरे होते. यावेळी बोलताना आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील पश्चिम भागात पुर्वी डोंगर दऱ्या खोऱ्यांतील रुग्णांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी लागत होते. दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या होत्या. अशा वेळी आरोग्य सेवेची खरी गरज मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या कोकरुड येथे होती.हे ओळखुन रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे डॉ.एस.एन.पाटील यांनी प्रामाणिक पणे वैद्यकीय सेवेची अखंडता जपली आहे. या कार्यक्रमास जि. प. सदस्य सजेॅराव पाटील-पेरिडकर, गोकुळ दुध संघाचे संचालक करणसिंग गायकवाड, विश्वास सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव घोडे-पाटील, विकास नांगरे, एम.डी.अशोक पाटील, विश्र्वासचे संचालक सुहास घोडे-पाटील, सरपंच गणपत कांबळे, पांडुरंग पाटील, उपसरपंच पोपट पाटील, के. वाय. पाटील, सुजित पाटील, नामदेव पाटील,एन.एच.पाटील, कृष्णा पाटील, डॉ. एस. एन.पाटील, डॉ.पंकज पाटील, उषाताई पाटील, डॉ प्रज्ञा पाटील, आदींसह डॉ.एस.एन.पाटील पतसंस्थेचे पदाधिकारी, कोकरुड येथिल प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!