ताज्या घडामोडी

शिराळा तालुक्यातील वारणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाले बद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे हस्ते सत्कार

Spread the love

शिराळा /प्रतिनिधी

आशिया खंडातील महत्वपूर्ण असलेला वारणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी मिळालेली संधीचा उपयोग नूतन पदाधिकारी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी करावा असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
वारणा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध संचालक पदी विजय पाटील मांगले, शामराव पाटील सागाव, व रंजना पाटील कांदे यांना संधी मिळाली असून त्यांचा सत्कार माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.तर यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवा नेते रणजितसिंह नाईक, तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाईक पुढे म्हणाले, आशिया खंडामधे नावारूपाला आसलेला साखर कारखाना म्हणून वारणा कारखान्याकडे पाहिले जाते. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हित या कारखान्याच्या माध्यमातून जोपासले जात आहे . संपूर्ण राज्यामध्ये नावलौकिक असलेल्या साखर कारखान्यामध्ये पदाधीकारी म्हणून काम करणेसाठी मिळालेली संधी ही कौतुकास्पद आहे. या संधीचा उपयोग शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व प्रगतीसाठी केला पाहिजे. वारणा उद्योग समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांचे अचूक व पारदर्शक नियोजन असल्यामुळे वारणा कारखान्यासह इतर उद्योग समूहातील संस्था प्रगतीपथावर आहेत. शिराळा तालुक्यातील मांगले, सांगाव व कांदे गावाला संचालक पदाची मिळालेल्या संधीमुळे वारणा काठावरील गावांना या निमित्ताने न्याय मिळाला आहे.

सुखदेव पाटील म्हणाले, केंद्र सरकारने साखर कारखान्याना प्रचंड मोठे सहकार्य व मदत केल्यामुळे आज शेतकऱ्यांना योग्य दर मिळत आहे. वारणा कारखान्याच्या संचालक पदी मिळालेल्या संधीचे पदाधिकाऱ्यांनी कारखान्यामार्फत शेतकऱ्यांसाठी उपयोग करून शेती उपयोगी नवनवीन उपक्रम राबवून ऊस प्रोत्साहन देणे कामी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिराळा नगरसेवक उत्तम (बंडा) डांगे सरपंच विजय महाडिक, संचालक सागर पाटील, विक्रम पाटील, शशिकांत पाटील, कांदे उपसरपंच विश्वास पाटील, प्रताप पाटील,काका सावकर, किरण गायकवाड, सौ रूपाली पाटील,सौ दीपा पाटील ,सौ धनश्री पाटील, सौ सावित्री पाटील, श्रीकांत पाटील, दिलीप पाटील ,संजय सपकाळ, के एन पाटील, अमित कुंभार, रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, शुभम पाटील, सुरेश पाटील, बाबासाहेब पाटील,अजय पाटील, विठ्ठल जाधव, बबलू शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ-: वारणा साखर कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतेवेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक , रणधीर नाईक, सुखदेव पाटील रणजीतसिंह नाईक, वारणा संचालक विजय पाटील ,शामराव पाटील,रंजना पाटील, आदी मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!