आरोग्य व शिक्षण

लोणावळा शहर काँग्रेसचे भाजप नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात आंदोलन

Spread the love

लोणावळा : लोणावळा शहर काँग्रेसच्या वतीने आज भाजपा नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन पार पडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा भाजप नेते विपर्यास करत आहे असा आरोप लोणावळा शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

तसेच लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भाजपच्या वाचाळ वीरावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखिल कवीश्वर, माजी नगरसेवक नासीर शेख, रवी सलोजा, सुनील मोगरे,मोहंमद मण्यार, युवक अध्यक्ष दत्ता दळवी, अब्बास खान, मंगेश बालगुडे, प्रफुल्ल राजपूत, मारुती राक्षे, आकाश परदेशी, अमोल शेडगे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!