ताज्या घडामोडी

कर्मकांडाला तिलांजली देत बहुजनांनी आपल्या घरातील सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने पार पाडावेत.- सत्यशोधक रघुनाथ ढोक

Spread the love

भोसरी (पुणे)- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त दि.२०.१.२०२२ रोजी रात्री ७ वाजता महादेवनगर भोसरी येथे सौ .रुपाली जितेंद्र चौधरी यांच्या घराची महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश सोहळा पार पडला .महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सुरुवातीला सौ .रुपाली व जितेंद्र चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर सौ. ज्योती व नकुल महाजन यांचे हस्ते घराला व छत्रपती शिवाजी ,छत्रपती संभाजी महाराज ,डॉ .आंबेडकर ,संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि याप्रसंगी राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान ,महात्मा फुले समग्र वाड्मय यांचे देखील पूजन करण्यात आले.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले कि कर्मकांडाला तिलांजली देत बहुजनांनी आपल्या घरातील सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने पार पाडावेत. या आधुनिक काळात जग पुर्ण विज्ञान निष्ठ असताना देखील ब्राम्हणानी पूजा पाठ , होमहवन केल्याशिवाय, गृहप्रवेश करू नये ही भीती बहुजनांनी सोडून दिली पाहिजे .आज चौधरी कुटुबाने महापुरुषांचे विचाराने नवीन पिढीला आदर्श दिला हे देखील महत्वाचे आहे. शिवकाळात महाराजांनी अनेक गड जिकंले काही वेळेस अमुष्या असताना देखील लढाई, मोहीम राबवून यश मिळविले पण कोठे पुजा घातल्याचे ऐकिवात नाही परंतु पेशवाई लयास गेल्यानंतर अनेक प्रकारे भटजी पुजापाठ करून बहुजनांची आर्थिक पिळवणूक करू लागले. याला पायबंध घालण्यासाठी महात्मा फुले यांनी १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज प्रबोधन केले आहे. पुढे ढोक असेही म्हणाले की या कोव्हीडच्या काळात आर्थिक उधळपट्टी न करीता कमी लोकात सर्व कार्यक्रम करावेत या साठी सत्यशोधक पर्याय महत्वाचा आहे असे देखील म्हंटले.
यावेळी रोहिदास तोडकर म्हणाले की घरासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा यथोचित सन्मान करा आणि सत्य काय आहे याचा आपण शोध घ्या. अंधश्रद्धा, कर्मकांड,याला मूठमाती देत कार्य पार पाडावे असे देखील म्हंटले.
यावेळी पत्रकार योगेश घाडगे आणि खानदेश माळी मंडळाचे सचिव नकुल महाजन यांचे हस्ते चौधरी कुटुबाला राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्यशोधक गृहप्रवेश केला म्हणून सन्मापत्र व शिवफुले शाहुआंबेडकरसावित्रीबाई याची फोटो प्रेम भेट देण्यात आली.तर संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक ढोक यांनी महात्मा फुले यांचे वेशभुषेत पुजा विधी संपन्न करीत सत्याचा अखंड व सत्यशोधक आरती म्हंटली तर रोहिदास तोडकर यांनी सर्वांकडून संविधान उद्देशिका वधवून घेतली .यावेळी घरासाठी ज्यांनी मदत केली त्या तीन कामगारांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. तर शेवटी नकुल महाजन यांनी आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!