ताज्या घडामोडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 24 व 25 जानेवारीला ऑनलाईन रोजगार मेळावा – सहायक आयुक्त ज. बा. करीम

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी दि. 24 व 25 जानेवारी 2022 रोजी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील मेकॅनिकल इंजिनिअर, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, डिझेल मेकॅनिक, फिटर, वेल्डर, हेल्पर, सेल्स असोसिएटस, सेल्स कन्सलटंट, कस्टमर रिलेशनशिप एक्झकेटिव्ह, सेल्स मॅनेजर, सर्व्हिस मॅनेजर, ट्रेनी सेल्समन / सेल्सगर्ल्स तसेच एस टी महामंडळामध्ये ॲप्रेंटिससाठी मेकॅनिक मोटार व्हेईकल, मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रिलेशनशिप ॲण्ड एअर कंडिशनिंग, मशिनिष्ट व टर्नर इत्यादी जागा भरण्यात येणार आहेत. ही पदे इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीधर व पदव्यूत्तर तसेच आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदवी/पदविका उमेदवारांसाठी रिक्तपदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे Web : https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळाव्दारे लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी.
पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी दि. 23 जानेवारी 2022 पर्यंत आपआपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!