ताज्या घडामोडी

मांगले सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते सम्पन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
मांगले येथील मोरणा वि.का.स. सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले.
आमदार मानसिंगराव नाईक ( भाऊ ) यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल युवा नेते नविंकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवा नेते विराज नाईक यांचा सत्कार सत्यजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी विश्वास सहकारी साखर कारखाना चिखली चे नूतन संचालक सुरेश पाटील, संदीप तडाखे, दत्तात्रय पाटील यांचा सत्कार मोरणा उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी कै. विलासराव पाटील (दादा) यांनी तात्यासाहेब कोरे, राजाराम बापू पाटील, फत्तेसिंग राव नाईक ( आप्पा) यांच्या बरोबर सहकार क्षेत्रात पाऊल टाकले. त्यावेळच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता मांगले येथे मोरणा दूध संस्थेची ची स्थापना केली. शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन धन टेक पाणीपुरवठा संस्था सुरु केली. दादा दूरदृष्टीने काम करणारे नेते होते.
वारणा दूध संघाचा विस्तार करण्यामध्ये दादांचा फार मोठा वाटा होता. त्यांनी उभारलेल्या संस्था तितक्याच जबाबदारीने सांभाळल्या पाहिजेत . माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच मिनाताई बेंद्रे, मोरणा विकास सोसायटीचे चेअरमन जयवंत चौगुले ,जयवंत पाटील, उदय पाटील, डॉ.सतीश पाटील,श्रीकांत पवार, पांडुरंग चौगुले,संदीप शिंदे, राहुल पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!