आरोग्य व शिक्षण

नानोली मावळ येथील कातकरी व आदिवासी वस्तीवर दिवाळी साजरी

स्वामी विवेकानंद सेवा संस्था व बजरंग दलाचा अनोखा उपक्रम

Spread the love

नाणोली : स्वामी विवेकानंद सेवा संस्था व बजरंग दलाच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील वेगवेगळ्या खेडोपाडी जाऊन कातकरी, ठाकर, आदीवासी, वाड्या वस्त्यांवर जाऊन दिवाळी साजरी केली जाते.

” जे का रंजले गांजले !त्यासी म्हणे जो आपुले !!
तोचि साधू ओळखावा !देव तेथेची जाणावा !!

या अभंगाप्रमाणे समाजातील वंचित बांधवांना दिवाळीसारख्या सणामध्ये एक गोडवा निर्माण व्हावा. त्यांनीही आनंदोत्सव साजरा करावा हा हेतू मनाशी बाळगून, समाजाच्या प्रगतीसाठी स्वामी विवेकानंद सेवा न्यास संस्था गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी दिवाळी साजरी करत आहे.समाजातील गरीब -श्रीमंत, गाव- शहर ,जाती-पातीचा ,भेद मिटवून सर्वांनी बंधुत्वाच्या नात्याने एकत्र यावं. गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे हा भाव मनाशी बाळगून संस्था काम करत आहे .

या वाडी वस्तीवर जाऊन सर्व कातकरी बांधवांच्या घरासमोर रांगोळी काढून, पणत्या लावण्यात आल्या,प्रत्येकाच्या घरावर आकाश कंदील लावून, भगवे ध्वज लावण्यात आले. प्रत्येकाला दिवाळीची भेट दिली गेली, सर्व बांधवांना कपडे भेट देण्यात आले. तसेच या ठिकाणी जेवण तयार करून सर्वांनी एकत्र घेऊन स्नेहभोजन देखील केले .

स्वामी विवेकानंद सेवा न्यास या संस्थेने आज आमच्या आदिवासी वस्तीवर येऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवला त्याबद्दल आम्हाला खूपच अभिमान वाटत आहे असा भाव या वस्तीमधील तरुण विष्णू वाघमारे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात बोलताना संस्थेचे विश्वस्त कैलास गायकवाड यांनी या बांधवांच्या प्रत्येक अडचणीत उभे राहण्याचे आश्वासन दिलं तसेच बजरंग दलाचे विभाग संयोजक संदेश भेगडे यांनी स्वातंत्रसैनिक नाग्या कातकरी यांचे जीवन चरित्र मांडले. त्याच बरोबर विश्वस्त संतोष महाराज कुंभार यांनी बांधवांच्या प्रत्येक सुखदुःखात समरस होऊन अडचणी सोडवण्याचा व शासकीय कामातील प्रत्येक अडचण दुर करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात केला जाईल असे सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गोपीचंद कचरे यांनी केले. गणेश महाराज जांभळे, दिलीप महाराज खेंगले, दत्ता महाराज शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या, कार्याध्यक्ष सदानंद पिलाने यांनी सर्वांचे आभार मानले व प्राध्यापक बाळासाहेब खांडभोर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमाला बजरंग दल चे विभाग संयोजक संदेश भेगडे, विश्वस्त कैलास गायकवाड ,पुणे जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष संतोष कुंभार, दत्त महाराज शिंदे, दिलीप महाराज खेंगले, संस्थेचे संस्थापक गणेश महाराज जांभळे, गोपीचंद कचरे, दत्ता महाराज गरुड, सदानंद पिलाने, तात्यासाहेब धांडे सर,
कुंदन भोसले, संदेश खोंडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!