आपला जिल्हामहाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 100 वर्षाचे होते.

गेले काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बाबासाहेबांचे मुळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्याजवळील सासवड येथे झाला. पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळात त्यांनी संशोधक म्हणून काम सुरू केले.त्यानंतर ते महाराष्ट्राबरोबरच देशात इतिहास संशोधक व शिवशाहीर म्हणून ओळखले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी हजारो व्याख्याने दिली.

बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या नाटकाला महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली. भव्य रंगमंच, असंख्य हत्ती, घोडे असे प्राणी व दीडशे ते दोनशे कलावंत असे हे भव्यदिव्य नाटक होते.

2015 मध्ये महाराष्ट्रभूषण तर 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आवाज न्यूजच्या वतीनेही या शिवशाहीराला भावपूर्ण श्रद्धांजली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईट वरील मजकुर कॉपी करू नये