ताज्या घडामोडी

पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते मंगळवारी ७ कोटींच्या विकास कामांचे उदघाटन – आमदार मानसिंगराव नाईक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

मंगळवारी (ता. २५) राज्याचे जलसंपदा मंत्री व ग्राम विकास मंत्री शिराळा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते ७.०८ कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या विकास कामांची उदघाटने होणार आहेत. तसेच बऱ्याच वर्षांपासून मागणी असलेल्या धनगरवाडा (मणदूर) येथील शेतकऱ्यांना सातबार वाटप करणार आहेत. ही माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, शिराळा येथे सकाळी ११ वाजात ४.०८ कोटी खर्चून बांधलेल्यास ‘पंचायत समिती, शिराळा’ नूतन वास्तूचे उद्घाटन समारंभ राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सांगलीचे पालकमंत्री मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते व राज्याचे ग्राम विकास मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. त्यानंतर दुपारी २:०० वाजता राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा सांगलीचे पालकमंत्री मा. ना. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते धनगरवाडा (मणदूर) येथील शेतकऱ्यांना सातबारा वाटप करतील. त्यानंतर दुपारी ३:३० वाजता ते ३:०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उदघाटन करतील. वरील सर्व ठिकाणी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विराज नाईक, माजी सभापती, सदस्य सम्राटसिंह नाईक, सभापती मनिषाताई गुरव, उपसभापती बी. के. नायकवडी, सदस्य वैशालीताई माने, मायावती कांबळे व सारीका पाटील यांच्यासह स्थानिक नेते मंडळी, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!