ताज्या घडामोडी

आधार – मोबाईल लिंक करण्यासाठी घरपोच विशेष मोहिम – ज्ञानेश कुलकर्णी, उपविभागीय डाक निरीक्षक, विटा

Spread the love

सांगली जिल्ह्यातील सर्व डाककार्यालयातून UIDAI च्या CELC App द्वारे आधारला मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा सुरु केली असून नागरिकांना घरपोच आधार-मोबाईल लिंक करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून दि. २४ जानेवारी ते ते २७ जानेवारी २०२२ दरम्यान संपूर्ण सांगली जिल्ह्यात विशेषत: कडेगांव, खानापूर व आटपाडी तालुक्यात प्रत्येक गावात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री.ज्ञानेश कुलकर्णी, उपविभागीय डाक निरीक्षक विटे यांनी दिली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक ही भारत सरकारने भारतीय डाक विभागामार्फत सुरु केलेली बॅंकिंग सेवा असून त्याद्वारे मनीट्रांसफर, DBT, BILL PAYMENT,आरटीजीएस आदी सुविधा या बॅंकेतर्फे देण्यात येत आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंक ही लोकाभिमुख बँक असुन प्रत्येक व्यक्ति पर्यंत शासनाचे लाभ पोस्टमनच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात डाक विभागाने घरपोच अदा केले आहेत. यासाठी प्रवर अधीक्षक सांगली श्री. रुपेश सोनावले यांचे मार्गदर्शन व IPPB शाखा प्रबंधक श्री . विनायक पासंगराव, डाक आवेक्षक श्री. सुनील पाटील यांचे सहकार्य मिळाल्याचे श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले.

ह्या सोयीमुळे नागरिकांना घरपोच त्यांच्या आधारला मोबाईल क्रमांक लिंक / अपडेट करता येणार आहे. त्यासाठी ग्रामस्थ/ नागरिक एकत्रितपणे एकाच वेळेस लिंकिंग साठी त्यांच्या पोस्टमनला भेटू शकतात व ह्या विशेष मोहिमेदरम्यान सर्वांचे आधार-मोबाईल लिंक करून घेऊ शकतात. याबरोबरच इतर मोठ्या अस्थापना/ कार्यालयेइ.चे प्रमुख देखील त्यांच्या कर्मचार्यांसाठी एकत्रितपणे सर्वांचे आधार-मोबाईल अपडेटकरून घेण्यसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा पोस्टमन यांना संपर्क करू शकतात.

आधारला मोबाईल क्रमांक लिंक कशासाठी आवश्यक आहे ?

आधारला मोबाईल लिंक असल्याने इतर कुणी आपल्या आधारच्या माहितीचा दुरुपयोग करू शकत नाही, कारण त्याची अद्ययावत माहिती लगेच आपल्या मोबाईल येते, त्यामुळे आपली फसवणूक होत नाही, आधारमध्ये बरेचशे बदल आधार OTP ने स्वतःच ऑनलाईन करून घेणे शक्य होते, PAN कार्ड, Driving License, Passport इ. काढण्यासाठी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे, शासनाच्या बऱ्याच योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक असते. जसे कि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (मार्च २०२२ पासून पुढील हफ्त्यासाठी Ekyc आवश्यक केले आहे ) , इ-श्रम कार्ड, विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरणे, रिक्षाधारकांचे अनुदान किंवा भविष्यात येऊ घातलेल्या इतर योजना इ.,EPFO च्या सर्व सदस्यांना त्यांचे UIN (EPF खाते) आधारला लिंक करावयास सांगितले आहे आणि ते करण्यासाठी आधी आधारला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेने जवळच्या पोस्ट ऑफ़ीसशी अथवा आपल्या पोस्टमनशी संपर्क साधावा व या सेवेचा ह्या विशेष मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही सांगली डाक प्रवर अधीक्षक श्री रूपेश सोनवले व श्रीज्ञानेश कुलकर्णी, उपविभागीय डाक निरीक्षक विटे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!