ताज्या घडामोडी

भाजपा नगर सेवक बाळा तावडे यांचा पंचवार्षीक जन सेवावृत्तांत प्रकाशन सोहळा संपन्न.

Spread the love

मुंबई मधील कांदिवली पश्चिम मधील भाजपा नगरसेवक व कांदिवली चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे यांच्या पाच वर्षातील वार्ड क्रमांक २० चा जनसेवावृत्तांत कांदिवली पश्चिम मधील श्री.सत्स संग भवन मध्ये भाजपा उत्तर मुंबई चे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला. बाळा तावडे, यांनी सन २०१७ते २०२१या पर्यंतचा आपल्या नगरसेवक कार्यकाल मध्यें कांदिवली पश्चिम मधील वार्ड क्रमांक २० मधील विविध सहकारी सोसायट्या व झोपड्डपट्टी विभागातून डांबरीकरण, लसीकरण, लादीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा,ई श्रम कार्ड नोंदणी आभियानचे आयोजन, रक्तदान शिबीराचे आयोजन, आरोग्य शिबीराचे आयोजन, गटारांची दुरुस्ती,वगैरे वगैरे नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून जणमाणसात आपला वेगळाच ठसा उमटवला व आपली लोकप्रियता वरचेवर वाढवित कार्य केले आहे. या प्रसंगी आरोग्यसेविका,डाक्टर,मनपा सफाई कामगार,सोसायटीत चे पदाधिकारी व झोपड्डपट्टीतील पदाधिकारी, वार्ड क्रमांक २० भाजपा कार्यकर्ते, यांचे सत्कार व ई श्रम कार्ड वितरण,जेष्ठ नागरीक सत्कार आदी कार्यक्रम संपन्न झाले,याप्रसंगी भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, चारकोप विधानसभा आमदार योगेश सागर, नगरसेवक व गटनेते मनपा कमलेश यादव, दिलीप पंडीत,निखिल व्यास,महेश भट,नगरसेविका प्रतिभा गिरकर,प्रियंका मोरे,लिना दहेरकर,योगेश पडवळ, व्योमा भट,सिमा राणे,भारत कवितके ,विजय पाल,प्रविण पाल,मुकेश चौधरी,दिनेश जैस्वाल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!