आरोग्य व शिक्षण

कलाकार होता होता झाला कल्लाकार ! लेखक – हर्षल आल्पे

Spread the love

तळेगाव : काहीही म्हणा , पण सध्या बाकी गोष्टी सोडून कलाकार , त्यांची राजकीय मते , आणि ते करत असलेली कामेच जास्त चर्चेत आहेत . सोशल मीडिया नावाचा जो काही प्रकार आज आपल्या सगळ्यांच्या हातात जो आला आहे , आणि त्यात आपण कुणाच्या ही ओळख न पाळख नसताना ही आपण प्रतिक्रिया देऊ शकतो , वाद घालू शकतो . पूर्वी आपल्याला एखाद्याचे पटले नाही , वाद घालावासा वाटला तरी त्या कलाकारापर्यंत आपल्या नावासकट पोहोचणे अवघड होते . पण आता तसे नाही , आता जगभरातल्या कलाकारांच्या वक्तव्यांवर , त्यांच्या कलाकृतीवर आणि त्यांच्या एकूणच वागणुकीवर आपण प्रतिक्रिया देऊ शकतो , हे विशेष .

त्यात सुद्धा गमतीचा भाग असा , की , एकाच्या प्रोफाइल वर कमेन्ट मध्ये कुणी तरी भलतीच माणसे एकमेकांशी वाद घालत असतात , शिव्या घालत असतात . खर तर समाजमाध्यमे या साठी निर्माण झालेलीच नाहीयेत , हे कुणी लक्षातच घेत नाही .
फेसबुक चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी आधीच स्पष्ट केलय एका मुलाखतीत , की मी समाजात तेढ निर्माण व्हावी ,कुठे ही , या साठी फेसबूक ला जन्म दिलाच नाही , तर आपल्या हरवलेल्या मैत्रीसाठी , त्याचा शोध लागावा , एकमेकांच्या सुखदुख्खात सहभागी होता यावे , यासाठी खरतर फेसबूक चा शोध आहे , काही रंजक माहितीची देवाणघेवाण करता यावी यासाठी खरतर तो मंच असल्याचे झुकेरबर्ग काय इतर माध्यमांचे प्रमुख सांगतात , पण आम्ही काय करतो ? तर वाद घालतो .

खरतर आजकाल सार्वजनिक भाषेचा दर्जा खालवल्यासारखा वाटतो . हे एक तरुण असूनही खटकते . चारचौघात शिव्या दिल्या , की आपण कसे भारी , असला काही तरी गैरसमज समाजातल्या विविध स्तरात आहे . तो पहिल्यांदा बदलला पाहिजे . शिव्यांव्यतिरिक्त ही आपली भाषा (मातृभाषा ) समृद्ध आहेच की , राग व्यक्त करण्यासाठी इतर मार्ग असताना ही शिव्या देणे , हा एकमेव मार्ग जिथे समाजात पसरू लागतो तिथे समाज खर्या् अर्थाने आपल्या नीच पातळीवर उतरलाय असे वाटायला लागते .

मध्यंतरी एक चित्रपट सिनेमागृहात बघण्यात आला , ज्याच्या पहिल्या सीन पासूनच ते शेवटच्या सीन पर्यन्त नुसत्या शिव्या , साधे बोलणे सापडणारच नाही , समाजातील आजचे वास्तवच त्या चित्रपटातून व्यक्त होत होते . ते सगळे बघताना एकच प्रश्न पडत होता , की एवढा कुठला राग आहे , समाजात की तो आता कलाकृतीत ही उतरायला लागलाय . खर तर पूर्वीचे कलावंत ,हे संहिता निवडताना त्यातल्या भाषेला महत्व द्यायचे ,आज ही नसीरुद्दीन शहा , अमिताभ बच्चन , अशोक सराफ यांसारखे दिग्गज कलावंत आपल्या कलाकृतीतून भाषेला महत्व देताना दिसतात . त्यातील अमिताभ बच्चन आणि अशोक सराफ यांनी पडद्यावर शकतो शिव्या देणार नाही , असा पण केल्यासारखे भासते . नसीरुद्दीन शहा यांच्या बाबतीत बोलायचे तर ते अनेक वेळा समाज माध्यमांवर आपल्या राजकीय मतांमुळे चर्चेत दिसतात .

खरतर या सगळ्या दिग्गज कलाकारांचा अभिनय बघणे आपण जास्ती पसंत केले पाहिजे , एखादी भूमिका ही व्यक्ति का करतीये ? यात न जाता , ती कशी केली गेलीये , ती भूमिका खरच प्रभावित करतीये का ? हे बघणे जास्त महत्वाचे आहे . चित्रपट , मालिका निर्मिती ही खरतर सगळ्यात अवघड गोष्ट आहे , कारण ती बनवताना ती खरच यशस्वी होणारे का ? त्यात काही विघ्न तर येणार नाही ना ? या सगळ्याच्या बाबतीत त्याच्या निर्मात्यांमध्ये एक भीती असतेच . म्हणून तर बहुतांश वेळा त्यात काही वाद तयार होऊ नयेत , याची काळजी घेताना बहुतांश निर्माते दिसतात . लाखो करोडो रुपये ज्यामध्ये गुंतलेले असतात , ते परत येणार की नाही याची कुठलीही शाश्वती कुणीही ती तयार होताना देऊ शकत नाही . आणि त्यामुळेच त्यात काम करणार्याश कलाकारांना ही सावध राहावे लागते , जे करार होतात , निर्माते आणि कलाकारांमध्ये त्यात सावधगिरीचे कलम असतेच असते .

नामवंत कायदे पंडितांची या साठी मदत घेताना निर्माते दिसतात . आणि त्या कलमांचा भंग झाल्यास त्या कलाकाराला बद्लायचा अधिकार निर्मात्यांना या करारान्वये असतोच . आणि तसे ही एखाद्या जाती धर्माच्या विरुद्ध , राज्याविरुद्ध , देशाविरुद्ध अश्लाघ्य भाषेत किंवा कुठल्या ही स्तरांवर टीका करू नये , असा आजवरचा नियम होता . आणि आहे . माझा वैयक्तिक अनुभव तर असा आहे की , दूरदर्शन , आकाशवाणी , तसेच सरकारी पातळीवर हा नियम अगदी काटेकोरपणे पाळला जातो . आणि तो भंग करणाऱयाविरुद्ध कडक कारवाई करून त्याला त्या ठिकाणचे दरवाजे बंद केले जातात . वर्षानुवर्ष हे पाळले जाते आहे , आणि यात काहीही बदल होणे शक्य नाही .

खरतर हे नियम हे समाजातल्या सर्वच स्तरांवर काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत . अशी अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो . तेच माणुसकीला धरून आहे . जे रोज जातीपातीबद्दल आक्षेपार्ह लिखाण करतात , समाजमाध्यमावर जे अर्वाच्च भाषेत जे व्यक्त होत असतात , त्यांना सांगावेसे वाटते , की एका समाजाकडून अन्याय झाला ही असेल , पण आज 2022 मध्ये आम्ही निदान आज तरी माणुसकीवर विचार करणार आहोत की नाही , का ? हे सूडचक्र असेच पृथ्वीच्या अंतापर्यंत घेऊन जाणार आहोत . एका पिढीकडून दुसर्याा पिढीकडे हस्तांतरित करणार आहोत ? त्यापेक्षा सकारात्मक विचार आम्ही निश्चितच देऊ शकतो .

समाजातल्या बाकीच्या लोकांकडून काहीही अपेक्षा करण्याआधी कलाकारांकडून ही अपेक्षा निश्चितच आहे , कारण आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून सर्वच जाती धर्मांच्या लोकांशी जात धर्म विसरून चांगले काम आपण करत असतो . त्यामुळे बाहेर तुम्ही एका जातीला , धर्माला शिव्या घालणार आणि तिथे दुसर्याा ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर कलाकृतीत काम ही करणार , हा वैचारिक खोटारडेपणा आपण करू नये , असे समाजातले सुज्ञ लोक सांगतात , तिथे कलाकार असण्यापेक्षा आपण कल्लाकारिता करून सर्वच गोष्टींचे , तत्वांचे मारेकरी ठरतो , जरी आपण संत साहित्याचे दाखले जरी देत असू , तरी संतांनी माणुसकी शिकवण्याचा , रुजवण्याचा प्रयत्न केला , म्हणून ते संत झाले . म्हणून आजही अनेक गोष्टींचे संदर्भ जरी बदलले तरी त्यांचे संतसाहित्य अजरामर आहे . हे कुठलाही दाखला देण्याआधी लक्षात घेतले पाहिजे . संतांनी क्षमाशीलता ही शिकवली आहे , हे आपण विसरूनच जातो . ज्या ज्या संतांना त्या त्या काळातील धुरीणानी त्रास दिला , त्यांच्या विरुद्ध वैचारिक बंड केले त्या त्या संतांनी , पण दिवसाच्या शेवटी जाती पाती बद्दल द्वेष न पसरवता जगाला त्यांनी प्रेमच अर्पिले , वाटले . त्यामुळेच संत साहित्याचा डोळस अभ्यास करण्याची , जाती धर्माच्या बाहेर राहून वाचण्याची गरज निर्माण झाली आहे . पुढच्या पिढ्यांना ते देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे , कलाकार म्हणून जवाबदारी ही आहे .

 


आणि समाजाने सुद्धा एखाद्या भूमिकेबद्दल कलाकारांना शिव्या घालणे थांबवले पाहिजे , कारण कलाकार फक्त ती भूमिका करत असतो , काहीवेळेला आव्हानात्मक वाटणारी भूमिका ही आपल्यातील वैचारिकतेच्या विरुद्ध असते , याचा अर्थ असा नाही की आपण त्या विचाराचे पाइक असल्यानेच आपण ती भूमिका करतो . नाही तर असे मानाचे का ? की अजमल कसाब ची भूमिका करणारा नट हा कसाब सारखाच विचार करतो , म्हणून त्याने ती केली का ? तर नाही , कलाकारांना , अभिनेत्यांना ही एक खुमखुमी असतेच , की कुठलीही भूमिका साकारताना जितके आव्हान मोठे , तितकेच ती भूमिका करताना मजा अधिक . आणि काळ बदलला की माणसाच्या विचारसरणीत हळू हळू परिस्थितीनुसार बदल होतात , हे आपण लक्षात घेतले पाहिजे , हे जसे समाजातल्या इतर लोकांना लागू आहे तसेच ते कलावंतांना ही लागू असते , आज जी भूमिका मी नाकारली ती कदाचित एका वर्षातसुद्धा मला ती करावीशी वाटुच शकते .याच्या उलटे ही होऊ शकते . त्यामुळे या बाबतीत समाजाने झुकते माप हे कलाकाराच्या पारड्यात टाकले पाहिजे . आणि कलाकारांच्या भूमिका , विचार , तत्वे याच्यावर जास्ती ऊहापोह न करता , त्यांना आपले काम करू द्यावे प्रामाणिकपणे

इतकेच ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!