ताज्या घडामोडी

लोह्याचे भूमिपुत्र गजानन भातलवंडे याना राष्ट्रपती चे पोलीस पदक जाहीर

Spread the love

लोहा तालुका प्रतिनिधी संतोष चेऊलवार

लोह्याचे भूमिपुत्र गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे याना राष्ट्रपती चे पोलीस पदक जाहीर झाले आहे.लातूर च्या स्थानिक गुन्हे शाखा ( एलसीबी) मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून गजानन भातलवंडे हे कार्यरत आहेत.यापूर्वी त्यांना राज्य सरकारच्या वतीने नक्षलवादी भागात अन्य उत्कृष्ट कामगिर बद्दल तीन पदके आणि प्रशस्ती पत्र आवार्ड मिळाले आहेत. नांदेड, परभणी, बीड येथील त्यांची कामगिरी अतिशय उत्कृष्ट अशीच आहे
भाषा प्रभुत्व, कार्य प्रणाली, व प्रामाणिकपणा , कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणूक तसेच त्याच्या कर्तृत्वामुळे ते पोलीस दलात आणि जेथे ड्युटीवर जातात त्या भागात लोकप्रिय असतात.त्यांचे लहान बंधू पांडुरंग भातलवंडे नांदेडच्या एलआयसी मध्ये वरिष्ठ ऑफिसर तर धाकटे बंधू मनोज हे परभणी येथे माध्यमिक पे-युनिट मध्ये अधीक्षक आहेत.
भूमिपुत्र भातलवंडे साहेब यांच्या या यशाबद्दल जिल्ह्याचे खा चिखलीकर साहेब, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सुर्यवंशी ,विठ्ठलेश्वर चे अध्यक्ष केरबाजी बिडवई , माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम,काँग्रेस शहराध्यक्ष वसंतराव पवार, उपनगराध्यक्ष शरद पाटील , माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल,, दता वाले,सरस्वती पतसंस्थेचे व्हा चेअरमन हरीभाऊ चव्हाण , , विजय चनावार ,पांडुरंग रहाटकर,महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्ष संतोष चेऊलवार, उपाध्यक्ष लोहा -शुभम उतरवार ,शहर अध्यक्ष -किरण दाढेल ,संघटक प्रमुख -अकबर सय्यद ,सचिव -लहु श्रीमंगले,कोषाध्यक्ष  -रशीद शेख ,सदस्य – अविनाश कांबळे ,सदस्य – शिवहार गालफाडे,मार्गदर्शक प्रमुखपदी -हानमंत कंधारे,कायदेविषयक सल्लागार अॅड परमेश्वर पाटिल,संपर्क प्रमुख सौ. कावेरीताई मारोती भेंडेगावकर यासह मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!