आरोग्य व शिक्षण

सर्वपक्षीय शोकसभेत शिवशाहीर स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील श्री गुरुजी न्यास आणि छत्रपती शिवशंभू स्मारक समिती यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

बुधवार (दि 24 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 7 वाजता योगीराज हॉल येथे आयोजित केलेल्या शोक सभेच्या वेळी आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, अविनाश भेगडे आणि 1954 पासून बाळासाहेबांसोबत असणारे जाणता राजा नाटकाचे प्रथम दिग्दर्शक प्रमुख वक्ते दिवाकर पांडे व्यासपीठावर उपस्थित होते. तर शहरातील अनेक मान्यवर इतिहास अभ्यासक जाणता राजा नाटकात काम केलेले रंगकर्मी आणि सर्व पक्षीय आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी सभागृहात उपस्थित होते.

बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना सर्वच वक्त्यांनी आठवणींना उजाळा देताना बाबासाहेब आणी तळेगावचे अतूट नाते तसेच तळेगावकर नागरिकां प्रति असलेला विशेष स्नेह बाबासाहेबांचे कार्य त्यातुन घडलेले लाखो इतिहास अभ्यासक जाणता राजा महानाट्याची निर्मिती आणि प्रवास अशा अनेक आठवणी स्मरत श्रद्धांजली वाहण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शिवछत्रपतींच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!