ताज्या घडामोडी

डिजिटल मीडिया संपादक आणि पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी सौ.मीरा शिंदे यांची निवड

Spread the love

26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डिजिटल मीडिया संपादक आणि पत्रकार संघाची अधिकृत घोषणा संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी केली. यावेळी सौ.मीरा शिंदे यांची उपाध्यक्ष तर संपादक दत्तात्रय पाटील यांची कार्याध्यक्ष पदी निवड केली असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी दिली.
ते म्हणाले सध्याच्या मोबाईल आणि अँड्रॉइड युगातील डिजिटल पत्रकाराचे जीवनमान धावपळीचे बनले आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया,प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियातील कर्तव्यदक्ष पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होण्याचे प्रमाण चिंताजनक बनले आहे या संघामार्फत पत्रकारांसाठी शासन दरबारी न्याय मागण्या करण्यात येणार आहेत. व संघटनेची राज्य कार्यकारणी तसेच आगामी काळातील उपक्रम लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती डॉ. सुनिल पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!