ताज्या घडामोडी

Spread the love

पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा असलेल्या महाराष्ट्रात आजही महिलांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागत आहे पुरोगामी हा शब्द फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरला जातो मात्र महिलांना मान देण्याची वेळ आल्यावर महिला निवडुन आल्या तरीही त्यांचा कारभार देखील पुरूषच पाहत असल्याचे आपल्याला पहायल मिळते भिगवण पत्रकार संघाने मात्र पुरोगामी विचार समाजात रुजवण्यासाठी विधवा महिलांना वाणाचा मान देउन सन्मान केल्याने महाराष्ट्रात पुरोगामी विचार रुजवण्याचे काम संघाच्या माध्यमातून होत असल्याचे दिसते डॉ दिगांबर दुर्गाडे भिगवण येथे बोलताना म्हणाले.

भिगवण पत्रकार संघाने पत्रकार दिन आणि मकरसंक्रांती निमित्त मुकनायक पुरस्कार आणि विधवा महिलांना वाण देण्याचा अनोखा उपक्रम केला यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नुतन संचालक दत्तात्रय येळे, पुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे,माजी बाजार समितीचे उपसभापती पराग जाधव, भिगवणचे सरपंच तानाजी वायसे आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्या प्रमिला जाधव या होत्या.
विधवा महिलांना समाजाने मुख्य प्रवाहात येण्या पासुन अडविले असले तरी भिगवण पत्रकार संघाने मात्र २११ महिलांना गुलाबी फेटे घालून वाण दिल्याने महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडुन वाहत असल्याचे पहायला मिळाले अनेक महिला सेल्फी घेत असल्याचे यावेळी पहायला मिळाल्याने समाजातील दुर्लक्षित वर्गाला प्रवाहात आणण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाल्याचे यावेळी दिसून आल्याने भिगवण पत्रकार संघाचे काम खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांच्या विचार धारेवर आधारित असल्याचे प्रमिला जाधव म्हणाल्या.
बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि मकर संक्रातीनिमित्त भिगवण पत्रकार संघाने २११ विधवा महिलांना साडी चोळी आणि भेट वस्तू देउन सन्मान केल्याने समाजात नेहमी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगांबर दुर्गाडे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थापक दादासाहेब थोरात यांनी केले सूत्रसंचालन संघाचे सचिव महादेव बंडगर, काशीनाथ सोलनकर यांनी केले तर आभार अध्यक्ष विक्रम शेलार यांनी व्यक्त केले.आजी अध्यक्ष अमोल कांबळे यांनी ओम क्रियेशनच्या प्रियांका गुंदेचा यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!