ताज्या घडामोडी

पालघरमध्ये मन हा मोगरा पुस्तकाचा प्रकाशन सोहोळा पार

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१
इमेज फौंडेशन,पालघर आयोजित शाहीर गंगाराम दत्तात्रय घरत लिखित मन हा मोगरा या स्वगताचा प्रकाशन सोहळा नुकताच महाराष्ट्र
आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेकभाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह पालघर येथे पार पडला.या पुस्तकात पालघर तालुक्यातील कोकणेर गावाचे विशेष वर्णन,पारंपारीक शेती विषयक माहिती त्याचे अनुभव,कुणबी अदिवासी, कातकरी यांच्या देवदेवतांचे उत्सव याचे रंजक कथन केले आहेत .ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नेताजी पाटील यांची प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे.यावेळी विवेक पंडित यांनी पुस्तकात लिहिलेल्या प्रसंगाचे विस्तृत वर्णन करताना पूर्वी लोकं निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगली, सोय सुविधांचा अभाव असतांनाही शिक्षणाची उर्मी होती आणि त्या कठीण परिस्थितीत त्यांनी यश मिळवले.त्यावेळच्या शाळा, प्रवास, जीवनशैली याचे चांगले वर्णन या पुस्तकात आले आहे असे सांगून लेखकाचे कौतुक केले तसेच पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करणारे उमेश कवळे यांचेही कौतुक केले.

यावेळी पालघर पंचायत समिती सभापती पालघर रंजना म्हसकर, उपसभापती चेतन पाटील,जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे उपस्थित होते.शाहीर गंगाराम घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हे पुस्तक म्हणजे माझे आयुष्य, माझे गाव कोकणेर, गावाची वैशिष्ट्य, त्याची ओळख याचे सिंहावलोकन आहे. तसेच प्रसिद्ध लोकशाहीर आत्माराम पाटील यांच्या साहित्याचा आणि कार्याचा प्रसार पालघर जिल्ह्यात व्हावा यासाठी लोकशाहीर आत्माराम पाटील प्रबोधिनी च्या माध्यमातून कार्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी केळव्याचे माजी सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील,सु.क्ष.युवक मंडळाचे अध्यक्ष दीपेश पावडे, आशियातील प्रथम तृतीयपंथी अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भविका पाटील,माजी सैनिक भाऊराव तायडे,मित्र परिवार व श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा घरत यांनी तर आभार जोती बडेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!