ताज्या घडामोडी

चेंबूरमध्ये अनंत मित्र मंडळ आणि खारदेवनगर मयुरेश्वर प्रतिष्ठानचा माघी गणेश उत्सव ४ रोजी

Spread the love

मुंबई – चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील अनंत मित्र मंडळ आणि खारदेवनगर मयुरेश्वर प्रतिष्ठान या दोन्ही मंडळांच्यावतीने सालाबादप्रमाणे यंदाही शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे.त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

या गणेश जयंती उत्सवानिमित्त अनंत मित्र मंडळातर्फे ४ फेब्रुवारी रोजी श्री गणेश याग, अभिषेक, होमहवन,दीप आरती तर ५ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद आणि रात्री ८ वाजता महिलांसाठी हळदी- कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.तर खारदेवनगर मयुरेश्वर प्रतिष्ठानतर्फे ३ फेब्रुवारी मूर्ती आगमन तर दुसऱ्या दिवशी श्री प्रतिष्ठापना, सत्यनारायण महापूजा,भजन,आणि ५ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद आणि बाप्पाची विसर्जन मिरवणूक आदि भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.तरी परिसरातील भाविकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन अनंत मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ पवार आणि मयुरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष यादव यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!