ताज्या घडामोडी

कोकणवासीय समाज महिला मंडळाचा हळदी कुंकू उत्साहात लक्ष्मीबाई कदम यांचा प्रामाणिक पणाचा सन्मान

Spread the love

चंद्रकांत सुतार–माथेरान

माथेरान कोकणवासीय समाज महिला मंडळाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ हॉटेल स्प्रिंगवुड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचा ,स्त्री एकता शक्तीचा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न कोकनवासीय समाज महिलानी केला, हळदी कुंकू संमारंभाची सुरवात दुपारी ठीक 3- 00 वाजता माजी नगराध्यक्षा , कोकनवासीय समाज संस्थेच्या सदस्या सौ प्रेरणा सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली, उपस्थित कोकनवासीय समाज महिलानी हळदी कुंकू एकमेकींना लावत शुभेच्छा देण्यात आल्या त्याबरोबर प्रत्येक महिलाना छोटेखाणी भेट वस्तू देण्यात आली, आजचा कोकनवासीय महिलाचा हळदी कुंकू कार्यक्रमात वेगळे पण दिसून आले, या वेळी माथेरान बी, जे, हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या सौ,वनिता दिघे यांनी कोरोना काळात आलेल्या पेशट बरोबर आपुलकी ने आपली जबाबदारी, कर्तव्य पार करत असताना जी सेवा केली,त्या बद्दल सौ वनिता दिघे याचा सन्मान करण्यात आला, माथेरान मध्ये जीवनमान व्यथित करत असताना संसाराची गाडी हाकताना भल्याभल्याची त्रेडातिडीपीट होते ,अशातच नवऱ्याचा आधार तुटल्याने अधिकच संकटे , माथेरान रेल्वे स्टेशन येथे ओझे वाहून आपला उदरनिर्वाह सांभाळणाऱऱ्या श्रीमती लक्ष्मीबाई कदम यांना माथेरान रेल्वे स्टेशनजवळ रस्त्यात पर्यटकांचे पैशाचे पर्स पडलेले मिळाले ,लक्ष्मीबाई यांनी पैसे असलेली ती पर्स परत त्या महिला पर्यटकांना परत केली, परिस्थितीचा कोणताही मनावर परिणाम न करता अगदी प्रामाणिक पणे ती पर्स परत केली , ह्या वयोवृद्ध आजी आईनच्या ह्या प्रामाणिक पणाचा, संस्काराचा सन्मान आज कोकणवासीय महिला मंडळांनी केला, यावेळी उपस्थित सर्व महिलानी उभे राहून लक्ष्मीआईचा आशीर्वाद घेतला,, माथेरानच्या प्रथम नागरिक सौ प्रेरणा सावन्त यांनी आपल्या नगराध्यक्ष कार्य काळात अनेक महत्व पूर्ण निर्णय घेत माथेरान पर्यटन वाढीव साठी माथेरांचा कायापालट करण्याचे उद्धेश ठेवला त्याचा प्रत्यय माथेरानमध्ये दिसत आहे, या सर्व गोष्टी ची दखल घेत सौ प्रेरणा सावन्त यांचा ही सन्मान यावेळी करण्यात आला, कोकनवासीय समाज संस्थेच्या सदस्या माजी,नगरसेविका सौ कीर्ती मोरे यांनी आपल्या नगरसेवक कार्यकाळात आपल्या प्रभागात विविध कामे मार्गी लावली, अनेकाच्या छोटी मोठी कामे सुखदुःखाद सहभागी झाल्या, याची हीदखल घेत कोकनवासीय समाज महिला मंडळाने सौ कीर्ती मोरे यांचा सन्मान केला, या वेळी महिला अध्यक्ष सौ उषा पांगसे ,परेन्दू मोरे कनिष्का रामाने, मंदिरा दळवी, सारिका पाटील, पौर्णिमा जाबरे, संगीता जाबरे, राजश्री दळवी,लीना पांगसे, रचना सावंत, श्रद्धा मढे, प्राजक्ता संनगरे आदी महिला कार्यकारणी ,व समाज महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या ,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!