आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

पवना धरणग्रस्त जमीन वाटपाबाबत संपूर्ण अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाकडे सादर करा – आमदार सुनिल शेळके 

Spread the love

मावळ : पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा सविस्तर अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारकडे सादर करण्याच्या सूचना आमदार सुनील शेळके यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतेच मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, महसूल विभाग, धरणग्रस्त संघटना व पाटबंधारे विभाग तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या बैठक संपन्न झाली.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी पवनख धरणग्रस्त जमीन वाटपासंदर्भात संपूर्ण अहवाल 15 फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाकडे सादर करावा अन्यथा पाणी बंद आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला.

पवना धरणाचे काम 1965 मध्ये सुरू होऊन 1973 मध्ये पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पासाठी 19 गावातील 2 हजार 394 हेक्‍टर क्षेत्र संपादित करण्यात आले होते. या प्रकल्पामुळे 1203 शेतकरी बाधित झाले. त्यापैकी 340 प्रकल्पग्रस्तांना मावळ व खेड या भागात जमिनीचे वाटप करण्यात आले होते. तर उर्वरित 863 प्रकल्पग्रस्त व 200 यांचे अजूनही संकलित यादीत नावे नाहीत असे एकूण 1063 खातेदारांना अद्याप जमिनीचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यांना जमीन मिळावी या व इतर मागण्यांसाठी धरणग्रस्त गेल्या 55 वर्षांपासून लढा देत आहेत. परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते .परंतु मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सर्व धरण ग्रस्त शेतकरी, धरणग्रस्त संघटना यांना विश्वासात घेऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला.

याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी तात्काळ प्रशासनाला सूचना देऊन पवना धरण परिसरात किती क्षेत्र शिल्लक आहे ते मोजण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत मिळालेल्या पुररेषेबाहेर 2705 एकर क्षेत्र उपलब्ध झाले असून त्यातील निव्वळ  वाटपासाठी 1568 एकर क्षेत्र उपलब्ध असल्याचे समोर आले. परंतु उपलब्ध क्षेत्र आणि खातेदार यांची तुलना करता वाटपासाठी क्षेत्र कमी पडत आहे .याबाबत कमी पडणारे क्षेत्र सरकारी गायराने किंवा इतर क्षेत्र घेऊन वाटपासाठी उपलब्ध करण्यात येईल असे चर्चेनंतर ठरविण्यात येईल.

यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे, उपजिल्हाधिकारी विजय देशमुख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता अधिकारी अशोक शेटे,रवी बच्चे, विलास मालपोटे, तहसीलदार मधुसूदन बर्गे, पवना धरण ग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मुकुंदराज काऊर, रविकांत रसाळ, दशरथ शिर्के, मारुती दळवी, बाळासाहेब काळे ,नारायण बोडके ,बाळासाहेब मोहोळ, किसन घरदाळे, राम कालेकर ,दत्तात्रय ठाकर, रवी ठाकर ,अरविंद रोकडे आदी उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!