आरोग्य व शिक्षणक्राईम न्युज

खोटे व बनावट खरेदी खत बनवल्या प्रकरणी तळेगावातील वकिलाला तीन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा 

Spread the love

तळेगाव : तळेगाव दाभाडे येथील श्रीमती उमाराजे संग्रामसिंह दाभाडे व इतर यांच्या सर्वे नं.348/1या वडीलोपार्जीत जमिनीचे खोटे व बनावट खरेदी खत बनवल्या प्रकरणी अॅड. नंदकुमार ज्ञानोबा काळोखे यांना न्यायालयाने 3 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.तसेच या प्रकरणातील फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून 40 हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

अॅड. नंदकुमार काळोखे यांनी नोटरी कुलमुखत्यार पत्राच्या आधारे श्रीमती उमाराजे संग्रामसिंह दाभाडे यांच्या जमिनीचे खोटे व बनावट खरेदीखत दस्त नोंदणी केले. याप्रकरणी दाभाडे यांनी तळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा 110/ 2011 अन्वये भा.द.वि. कलम 420,467,478,471 सह 34 अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक होडगर यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भरत बुरांडे यांनी 31 जानेवारी 2022 रोजी आरोपीस तीन वर्षांची शिक्षा व 50 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.या मधील दुसरे आरोपी निरफरके यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून अॅड. वाळके आणि अॅड. वीरकर यांनी तर फिर्यादीच्या वतीने अॅड. सचिन लोंढे व आरोपीच्या  वतीने अॅड. सुशिलकुमार पिसे यांनी काम पाहिले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!