ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून वीज वसुलीसाठी भाषा करणा-या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध

Spread the love

इस्लामपुरःप्रतिनिधी
पश्चिम महाराष्ट्रातील अनेकजण शेतकऱ्यांच्या जिवावर अनेक जण मंत्री झाले, मंत्री मंडळात स्थान मिळविले वीज प्रश्न शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून वसुलीसाठी भाषा करणार्या सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत, वेळ प्रसंगी सहकारमंत्री च्या विरोधी राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला.
जाधव पुढे म्हणाले की कारखान्याकडे पाठवलेल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलातुन महावितरणच्या थक्कित वीजबिल साखर कारखानदार कपात करून घेणार,शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची संमती नसताना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या फतव्यामुळे वीज बिल शेतकऱ्यांच्या ऊसबीलातुन महावितरणची कंपात करु हे कदापि खपवून घेणार नाही, राज्यातील या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.एका बाजूला राज्यातील काबाडकष्ट करणार्या शेतकऱ्यांना पदरात काहीच पडत नाही. मिश्र व पोटँश खतांच्या गोणी किमंत दोन हजारोंच्या दरम्यान गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्या वगळता राज्यातील एकाही साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी ची रक्कम दिलेली नाही. राज्यातील साखर कारखान्याचे थक्कित आहेत, शेतकऱ्यांच्या ऊसबीलातुन या निर्णय बालीशपणा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मागे घ्यावा. अन्यथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील याच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना विरोधात घरासमोर तीव्र स्वरुपाचे आंदोलने करण्यात येईल असा इशारा जाधव यांनी दिला..

■■ सहकार मंत्रीम्हणून नैतिक जबाबदारी पार पाडावी
कोल्हापूर जिल्हा वगळता राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील साखर कारखान्यानी एकरकमी कायदा असताना एकरकमी एफ्आरपी रक्कम दिलेली नाही ,स्वतः बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्याची एकरकमी रक्कम आधा करावी, सहकारमंत्री या नैतीक जबाबदारीतुन राज्यातील साखर कारखान्याचे थक्कीत रक्कम वसुल करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!