ताज्या घडामोडी

वाळवा येथील महिलेचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इस्लामपूर शाखेच्या वतीने जटा निर्मूलन करण्यात आले

Spread the love

इस्लामपूर प्रतिनिधी
वाळवा येथील सौ.विजया बजरंग पाटील (वय ५५) यांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इस्लामपूर शाखेच्या वतीने जटा निर्मूलन करण्यात आले. गेली ११ वर्षे अंधश्रध्देपोटी त्यांनी या जटा जोपासलेल्या होत्या. पाटील कुटुंबियांचे प्रबोधन करून कार्यकर्त्यांनी त्यांना जटा निर्मलनास प्रवृत्त केले.

वाळवा पंचायती समितीचे उपसभापती नेताजीराव पाटील (बाबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत जटा निर्मूलन करण्यात आले. डॉ.नितीन शिंदे, प्रा.सतीश चौगुले, अंनिसचे कार्याध्यक्ष प्रा.बी.आर.जाधव, निलेश कुडाळकर, राजेंद्र मोटे, अरुण पाटील यांनी सौ.पाटील यांचे जटा निर्मलन केले. सौ.पाटील यांच्या जटानिर्मलनासाठी मुलगा सागर, सुनबाई अश्विनी आणि सोनाली पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. अंधश्रद्धेपोटी जटा वाढवणे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. जटा हि दैवी देण असून त्या वाढवण्याचं काम भीतीपोटी केल जात. केसांची निगा नीट न राखणं, केसांमध्ये हळदीकुंकू अथवा वडाचा चीक टाकणं यामुळे जटा वाढण्यास मदत होते. जटा वाढवलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांवर परिणाम होतो, त्याचबरोबर डोके दुखणे आणि काम करताना असंख्य अडचणी येतात. भीती असल्यामुळे जटा कापण्यास व्यक्ती प्रवृत्त होत नाही किंबहुना कापल्या तर आपल्यावर दैवी प्रकोप होईल अशी समजूत आहे. खरं तर आज आपण एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये इतकी प्रचंड प्रगती केलेली असल्यामुळे अशा अवैज्ञानिक बाबींवर विश्वास ठेवू नये. आपल्या आसपास जटाधारी व्यक्ती असतील तर त्या संदर्भातील माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना द्यावी जेणेकरून सदर व्यक्तीचे समुपदेशन करून त्या व्यक्तीला जटा मुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल असे कार्याध्यक्ष बी.आर.जाधव यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!