ताज्या घडामोडी

माध्यमिक विद्यामंदिर जयगड प्रशालेत पंचायत समिती सभापती सौ संजना माने व जयगड विद्यालयाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प चे आयोजन

Spread the love

माध्यमिक विद्या मंदिर जयगड प्रशालेत माननीय पंचायत समिती सभापती सौ संजना उदय माने व माध्यमिक विद्या मंदिर जयगड यांच्या संयुक्त विद्यमाने सभापती यांच्या प्रयत्नाने विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती कॅम्प चे आयोजन करण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप वाघोदे ज्येष्ठ शिक्षिका सौ स्नेहा खेडेकर श्री मुकुंद पाटील निवास पाटील शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते जयगड ते रत्नागिरी हे 60 किमी अंतर असल्याने विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जाऊन आपले आधार कार्ड दुरुस्त करणे व नवीन काढणे अवघड होत आहे. ही कल्पना सौ माने मॅडम यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतः माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून आमच्या खेडे गावातील विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळावी अशा आशयाचे पत्र देऊन हा कॅम्प यशस्वीरित्या जयगड प्रशालेत आयोजित केला आहे. याबद्दल आमच्या संस्थेचे चेअरमन बशीर भाई सचिव रवींद्र पोटफोडे व्हाईस चेअरमन शरद चव्हाण व संचालक मंडळाने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!