ताज्या घडामोडी

रत्नागिरी नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व अॅक्टीव्ह फ्रेन्डस् सर्कल सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्ट व कल्चर महोत्सवांतर्गत जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा

Spread the love

अॅक्टीव्ह फ्रेन्डस् सर्कल सत्कोंडी

रजि. क्र. महाराष्ट्र / २५३१ / ए २५२० / रत्नागिरी, नेहरू युवा केंद्र (भारत सरकार) रत्नागिरीशी संलग्न

मु. सत्कोंडी, पो. सैतवडे, ता. जि. रत्नागिरी नेहरू युवा केंद्र रत्नागिरी (युवा एवं खेल मंत्रालय, भारत सरकार) व अॅक्टीव्ह फ्रेन्डस् सर्कल सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्ट व कल्चर महोत्सवांतर्गत जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा

स्पर्धेचा वार व दिनांक- शनिवार दि. १९ फेब्रुवारी २०२२ वेळ सायंकाळी ०७ – ३० वा. स्थळ- शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक संकल, सत्कोंडी

स्पर्धेचे नियम व अटी

🔸 सदर लोकनृत्य स्पर्धा खुल्या गटासाठी राहील.

🔸लोकनृत्य स्पर्धेमध्ये कमीत कमी ०६ तर जास्तीत जास्त १२ स्पर्धकांचा समावेश असावा.
🔸 एक स्पर्धकाला फक्त एकाच संघात भाग घेता येईल.

🔸लोकनृत्य स्पर्धेची प्रवेश फ़ी ३००/- रु. राहील.

🔸लोकनृत्य स्पर्धा प्रवेश अर्ज भरून देणे आवश्यक आहे.

🔸लोकनृत्य स्पर्धेमध्ये लोकनृत्याचा समावेश असणे आवश्यक आहे. • गीताचा कालावधी ५ ते ७ मिनिटांचा असावा.

🔸 लोकनृत्य पारंपारिक स्वरुपात असणे आवश्यक आहे. लोकगीतावर आधुनिक नृत्यप्रकार करता येणार नाही. रिमिक्स गाणी चालणार नाहीत.

🔸 लोकनृत्य स्पर्धेसाठीचे गाणे मोबाईल, पेन ड्राईक अथवा सी.डी वर आणणे आवश्यक आहे.
🔸गाणे वाजणे न वाजणे ही जबाबदारी संबंधित संघाची असेल.
🔸 परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

🔷रंगभूषा व वेशभुषा स्पर्धकांनी स्वतः करावयाची आहे.

🔷प्रत्येक संघाने स्पर्धा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी उपस्थित रहायचे आहे.

🔷 नृत्य सादरीकरणाचा क्रम बदलण्याचे अधिकार अॅक्टीव्ह फ्रेन्डस सर्कल सत्कोंडी या संस्थेला राहतील.

🔷 लोकनृत्य स्पर्धेमध्ये विनासुचना बदल करण्याचे सर्वाधिकार अॅक्टीव्ह फ्रेन्डस् सर्कल सत्कोंडी या संस्थेला राहतील.

💥पारितोषिके प्रथम क्रमांक- रोख ५५५५/- रु. प्रशस्तीपत्र व अपक

💥द्वितीय क्रमांक – रोख ४४४४/- रु. प्रशस्तीपत्र व चषक

💥तृतीय क्रमांक – रोख ३३३३/-रु प्रशस्तीपत्र व चषक
💥 चतुर्थ क्रमांक- रोख २२२२/- रु. प्रशस्तीपत्र व चषक

💥पंचम क्रमांक- रोख ११११/- रु. प्रशस्तीपत्र व चषक देण्यात येईल.
लोकनृत्य स्पर्धेत सहभाग घेणा-या प्रत्येक संघास सहभाग प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!