आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रीडा व मनोरंजन

पवनानगर येथील टेन्ट कॅम्पिंग व्यवसायिक व पोलीस प्रशासनाकडून, ख्रिसमस व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न…

अवैध घटना करताना आढळून आल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल. सत्यसाई कार्तिक  सहाय्यक. पोलीस अधीक्षक लोणावळा.

Spread the love

पर्यटन : पवनानगर येथील टेन्ट कॅम्पिंग व्यवसायिक व पोलीस प्रशासनाकडून, ख्रिसमस व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न…

अवैध घटना करताना आढळून आल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल : सत्यसाई कार्तिक  सहाय्यक. पोलीस अधीक्षक लोणावळा.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, २१ डिसेंबर.

ख्रिसमस व नववर्षांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून,पवनानगर भागातील टेन्ट  कॅम्पिंग व्यावसायकांची बैठक घेत त्यांना सुरक्षेबाबत विविध सूचना देण्यात आल्या. तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पवना कॅम्पिंग मालक,   चालक यांची बैठक सत्यसाई कार्तिक  सहाय्यक. पोलीस अधीक्षक लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली फांगणे गाव हद्दीतील रूरल लाईफ रिसाॅर्ट अँन्ड कॅम्पिंग पवना लेक येथे घेण्यात आली.

बैठकीमध्ये कॅम्पींगला येणाऱ्या पर्यटकांची डिटेल्स घेण्यात यावी, सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, येणार्‍या ग्राहकांची घातपात विरोधी तपासणी करणेसाठी मेटल डिटेक्टरची व्यवस्था करावी, अति तातडीच्या वेळी प्रथमोपचार सुविधा असावी, विद्युत रोषणाईच्या वेळी विद्युत निरीक्षक यांच्याकडून तपासणी करावी,  पर्यटकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.

कोणत्याही प्रकारे अवैध धंदे चालणार नाहीत, महिला व मुलीच्या बाबतीत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करावी, कॅम्पिंग मध्ये प्रवेशव्दार गर्दीच्या ठिकाणी पार्किंग परीसर याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अद्यावत करावेत.्स्पीकर परवाना घेऊन त्याच्या नियमाने पालन करावे,कॅम्पिंग ठरवून दिलेल्या वेळेपर्यंतच सुरु ठेवावे. कामगारांची चारित्र्य पडताळणी करून त्यांची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी. पवना धरणाच्या पाण्यात पर्यटक उतरून दुर्घटना पडणार नाहीत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.एखादा व्यक्ती संशयित वाटल्यास पोलीसांना कळविणे,  होणार्‍या संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.व सर्व विभागाची परवानग्या घेणे आवश्यक आहे.

या बैठकीला सहा पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक लोणावळा विभाग, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस हवालदार निवेश कवडे, संतोष शेळके, नितिन कदम, रफीक शेख, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक दत्ता शिंदे, पोलीस काॅन्स्टेबल सागर धनवे, सुभाष शिंदे होमगार्ड वाळूंज यांच्यासह पवना कॅम्पिंगचे  व्यावसायिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!