ताज्या घडामोडी

डॉ. छाया भानुदास साखरे यांना “आदर्श जीवन गौरव पुरस्कार” ने सन्मानित केले..

Spread the love

कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई तर्फे नुकताच “आदर्श जीवन गौरव पुरस्कार सोहळा” हॉटेल ‘थ्री स्टार’ खारघर, नवी मुबंई येथे पार पडला. राज्यभारातून विविध जिल्ह्यातून 600 प्रस्तावामधून मुंबई महानगरपालिका येथे स्पे.शिक्षिका या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. छाया भा. साखरे यांची निवड ” आदर्श जीवन गौरव पुरस्कार” यासाठी करण्यात आली. त्यांचे शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, कोरोना काळात गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत संगीत शिकवणे,
स्वपगारातून गरीब विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या रिऍलिटी शोमध्ये सहभाग करवणे, वेगवेगळ्या एन.जी.ओ मध्ये मोफत संगीत शिक्षण देणे. मुंबई आकाशवाणी, झी युवा मराठी चॅनेल, डी. डी मेट्रो इत्यादि अनेक टी. व्ही. चॅनेलवर गरीब होतकरू मुलांना संधी देणे इ. अनेक नॅशनल, इंटरनॅशनल लेवल वर त्यांनी कार्य केले आहे तसेच त्यांनी एका तासांमध्ये 62 भजने गाऊन आपले नामांकन “ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड”मध्ये केले आहे. ही फार गौरवाची बाब आहे.

डॉ. छाया साखरे यांना यापूर्वी अनेक अवॉर्ड ने सन्मानित केले आहे त्यांपैकी लिजेंड दादासाहेब फाळके अवॉर्ड, इंडियन स्टार अवॉर्ड, मुंबई महापौर पुरस्कार, अमेझिंग इंडियन पेर्सोनॅलिटी अवॉर्ड, दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड, राष्ट्ररत्न अवॉर्ड, गिरनार संगीत रत्न अवॉर्ड गुजरात, झी टाऊन सोसायटी अवॉर्ड आणि एम्पॉवरिंग विमेन्स ऑफ इंडीया अवॉर्ड, महात्मा गांधी अवॉर्ड तसेच ओ. एम. जी रेकॉर्ड, स्टार रेकॉर्ड बुक इंटरनॅशनल, नेशन प्राईड बुक रेकॉर्डस मध्ये नामांकन मिळाले आहे आणि आय.आय. यु इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी द्वारे ऑनरररी डॉक्टरेट डिग्री प्राप्त झाली आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय किर्तीचे वास्तुशास्त्रज्ञ डॉ. रविराज , अहिरराव, लोकशाहीर व सिनेगायक नंदेश विठ्ठल, जेष्ठ मराठी सिनेअभिनेते जयराज नायर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कॅन्सरतज्ञ व शास्त्रज्ञ डॉ. अमजद असदखान पठाण, महाराष्ट्र शासनाचे माजी उपसंचालक, पुणे विभाग श्री. सुयोग अमृतकर इ. मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. छाया साखरे याना मिळालेला राज्यस्तरीय आदर्श जीवन गौरव पुरस्कार” भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना समर्पित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!