ताज्या घडामोडी

शेख नाशिन सिराज यांना एमबीबीएस साठी प्रवेश मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री चंदन कुलकर्णी यांनी केले शेख नौशिन सिराज यांचा विशेष सत्कार

Spread the love

अंबाजोगाई दि.12 ( प्रतिनिधी )

बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध वृतपत्रलेखक शेख सिराज यांची कन्या कु. शेख नौशिन सिराज यांना एमबीबीएस साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , जळगाव या ठिकाणी प्रवेश मिळाल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री . चंदन कुलकर्णी यांनी शेख नौशिन सिराज यांचा शाल, बुकेहार , पुस्तक भेट देऊन विशेष सत्कार केला . सदरील सत्कार श्री. चंदन कुलकर्णी यांच्या निवासस्थानी छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला . यावेळी गटशिक्षणाधिकारी यांच्या मातोश्री तथा गोदावरीबाई कुं. कन्या प्रशालेच्या माजी ग्रंथपाल श्रीमती कुलकर्णी मीना , पत्नी श्रीमती कुलकर्णी मनिषा चंदन, केंद्रप्रमुख श्री. राजेसाहेब किर्दंत, शेख नौशिनच्या आई श्रीमती शेख शमीम बेगम सिराज, शेख सिराज आदि उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री . चंदन कुलकर्णी यांनी शेख नौशिन सिराज हीच्या घवघवीत यशाबद्दल विशेष अभिनंदन करुन वडील शेख सिराज, आई श्रीमती शेख शमीम बेगम यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलकर्णि यांच्या परिवारातील सदस्य, शेख परिवारातील सदस्य, आदि उपस्थित होते.. शेवटी सर्वांचे आभार शेख सिराज यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!