आरोग्य व शिक्षण

लोणावळ्यात भाजपचे नाना पटोले यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन 

Spread the love

लोणावळा  : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत आज लोणावळा भाजपने आंदोलन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नाना पटोले यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले . निषेध सभा घेण्यात आली.

यासंदर्भात नाना पटोले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, गटनेते देविदास कडू, नगरसेविका बिंद्रा गणात्रा, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे, युवा वॉरियर्स पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक प्रथमेश पाळेकर, नगरसेवक ललित सिसोदिया, माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर, अमित गंधे, प्रदिप थत्ते, भाजप युवा मोर्चाचे तसेच शहर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!