ताज्या घडामोडी

सावली निवारा केंद्रात पत्रकार दिन साजरा जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अनोखा उपक्रम

Spread the love

शिराळा-प्रतिनिधी 

मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने गुरुवारी येथील सावली बेघर निवारा केंद्रात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
पत्रकारांच्याहस्ते बेघरांना भोजन वाटप व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले. केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुजावर व अन्नपूर्णा वंदना काळेल यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मुस्तफा मुजावर म्हणाले की, सामाजिक कार्य करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला, मात्र पत्रकारांच्या प्रोत्साहनामुळे, पाठबळामुळे कार्यरत राहण्याची उर्जा मिळाली. पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे समाजाच्या जडणघडणीत त्याची भूमिका महत्त्वाची ठरते. इन्साफ फाऊंडेशनपासून सावली बेघर निवारा केंद्रापर्यंत माझ्या वाटचालीत पत्रकारांचा वाटा खूप मोलाचा आहे. शहरातील सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांप्रती पत्रकारांची भूमिका सकारात्मक असल्याने शहरात चांगल्या गोष्टी घडत आहेत.
मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर म्हणाले की, पत्रकारांच्या वेदना, अडचणी सोडविण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे. याच संघटनबळावर चांगल्या गोष्टी घडत आहेत. वृत्तपत्रांच्या अस्तित्वाचा प्रश्न आजवर कित्येक दशके उपस्थित होत आहे, मात्र वृत्तपत्रे कधीच संपणार नाहीत, त्यांचे अस्तित्व अबाधित राहणार आहे.
स्वागत विकास सूर्यवंशी यांनी, तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष बलराज पवार, पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर हुलवान यांनी मनोगत व्यक्त केले. आभार चंद्रकांत गायकवाड यांनी मानले.
यावेळी प्रमोद जेरे, प्रवीण शिंदे, किशोर जाधव, किरण जाधव, शैलेश पेटकर, दादासो बंडगर, सचिन ठाणेकर, सुधाकर पाटील, प्रशांत साळुंखे मोहन राजमाने, मोहन धामणीकर, मिलिंद धामणीकर, अभिजीत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राकेश दड्डण्णावर, संकेत आलासे आदी उपस्थित होते.
सिंधुताईंना श्रद्धांजली
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व सावली बेघर निवारा केंद्राच्यावतीने सिंधुताई सपकाळ यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंधुताईंच्या सांगली जिल्ह्यातील आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!