ताज्या घडामोडी
वाटद-मिरवणे येथील माजी सरपंच व्ही.टी.सावंत यांचे दुखःद निधन
वाटद-मिरवणे गावचे माजी सरपंच व्ही.टी.सावंत यांचे काल सायंकाळी सातच्या दरम्यान निधन झाले. ते माजी समाज कल्याण सभापती, जि.प.सदस्या सौ.ऋतुजा राजेश जाधव तसेच डॉ.विकी सावंत यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा व तीन मुली,पत्नी, सुन ,नातवंडे असा परिवार आहे.
एक उद्योगशिल,मेहनती,सडेतोड व्यक्तीमत्व लाभलेल्या व्ही.टी.सावंत यांच्या पवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी खंडाळा व परिसरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. 20/2/2022 रोजी सकाळी 11.30 वाजता साप्ताहिक जलदान विधी त्यांचे राहत्या घरी वाटद फाटा येथे आयोजित करण्यात आला आहे.