कृषीवार्तादेश विदेशमहाराष्ट्र

चिंचवड परिसरात गणेशोत्सव उत्साहात साजरा..

यंदाच्या वर्षी मात्र, शहरातील सर्व स्तरातील मंडळे एकत्रित येवून गणेशोत्सव साजरा केला. त्यातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका ठेपल्यामुळे जवळपास सर्वच मंडळांनी राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा प्रयत्नच यंदाच्या वर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने दिसून आला.

Spread the love
 चिंचवड परिसरात गणेशोत्सव उत्साहात साजरा..

आवाज न्यूज: गुलामअली भालदार चिंचवड ११ सप्टेंबर

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे पिंपरी चिंचवड शहरात गेली दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव जल्लोष साजराच झाला नव्हता. यंदाच्या वर्षी मात्र, शहरातील सर्व स्तरातील मंडळे एकत्रित येवून गणेशोत्सव साजरा केला. त्यातच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका ठेपल्यामुळे जवळपास सर्वच मंडळांनी राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा प्रयत्नच यंदाच्या वर्षी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने दिसून आला.

कामगारनगरी असलेल्या शहरात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केल्यानंतर शुक्रवारी अनंत चतुर्थीच्या निमित्ताने चिंचवड परिसरातील काळभोरनगर, दत्तनगर, इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, आनंदनगर, सुदर्शननगर, गावडे पार्क, तानाजीनगर, भोईरनगर, एस.के.एफ. सोसायटी, दळवीनगर, श्रीधरनगर, केशवनगर, चिंचवडगाव गावठाण आदी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळे तसेच, घरगुती गणपती बसविलेल्या नागरिकांनी परिसरातील मंडळांकडेच बाप्पाला स्वार करून ढोल, लेझीमच्या पथकाच्यांसमवेत वारकर्‍यांच्या भजनाने चिंचवड दुमदुमुन गेला, त्यातच छोट्याशा बालचमुपासून ज्येष्ठांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” घोषणांच्या गजरात गणपती बाप्पांना निरोप दिला. गणेशभक्तांचा मोठा उत्साह दिसून आला. रात्री बारापर्यंत 35 हून अधिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. तब्बल दहा तासांहून अधिक चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीत गुलालाची उधळणाऐवजी अनेक मंडळांनी फुलांची उधळणे करून वेगळा पायंडाच पाडला, असे दृश्य दिसून आले असले तरी, दुपारी सव्वातीन वाजता मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची सायंकाळी 6 नंतर मोठी गर्दी केली होती. चिंचवड, चाफेकर चौकात महापालिकेच्यावतीने स्वागत मंडप उभारण्यात आला होता. यावेळी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह सह पत्नीक सायंकाळी पावणे आठच्या सुमारास हजेरी लावली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, माधुरी कुलकर्णी, माजी नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे, मंडपातच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांच्या वतीने गठीत केलेल्या मोरया पुरस्कार समितीने विविध मंडळांचे परिषन करून नागरिकांना नियमांचे पालन करा आदी सूचना केल्या पोलिसांचे तसेच, सेवाभावी पोलिस मदतनीसांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरीकांना शिस्तीचे धडे दिले. पोलिसांनी मंडप परिसरात तसेच, पवना नदी तिरावरील मोरया मंदिर घाट, तसेच रिव्हर व्ह्युव परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यंदाच्यावर्षी गणेशाचे विसर्जन पवना नदीत न करता कृत्रिम हौदात करण्यात आले. अनेक गणेश मंडळांनी आपल्या मूर्तीचे संकलन केले. चिंचवड गावातील चौकात सायं.6 नंतर दुतर्फा मोठ्या संख्येने सर्व वयोगटातील नागरीकांची उपस्थिती होती. परंतु, सायं.7.30 ते 9.30 पर्यंत एकही गणेश मंडळ या चौकात न आल्यामुळे नागरिकांना गणपती मंडळाची वाट पाहावी लागली, हे दृष्य यावर्षीच दिसून आले. दुपारी सव्वातीन वाजता वेताळनगर येथील शिवस्तव मित्र मंडळाचे आगमन झाले.

पावणे चार वाजता तानाजीनगर येथील समर्थ मित्र मंडळ दाखल झाले. पाच वाजता काळभोरनगर येथील सुर्योदय मित्र मंडळ, साडेपाच वाजता इंदिरानगर येथील एकता मित्र मंडळ उपस्थित होते. साडेपाच ते साडेसात नंतर दोनच मंडळांनी हजेरी लावली. साडेसातच्या सुमारास आनंदनगर येथील क्रांतीवीर लहु जिवाजी प्रतिष्ठान मंडळाने हजेरी लावल्यानंतर थेट साडेनऊच्या सुमारास चिंचवडगाव येथील चिंचवडचा राजा संत ज्ञानेश्वर मंडळाने भव्य असा ‘भक्तीरथ’ उभारला होता. त्यात विठ्ठल-रुक्मिणी, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती होत्या.
गांधी पेठ तालीम मंडळांनेही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा केला होता. मिरवणुकीत दांडपट्टा, लाठीकाठी असे मर्दानी खेळ सादर केले. शिवदर्शन ढोल पथक सहभागी झाले होते. त्यानंतर क्रांतीविर भगतसिंह मित्र मंडळाचे बाप्पा फुलांनी सजवलेल्या पालखीतुन दाखल झाले. आरशाच्या डिझाईनचे मंदिर साकारले होते. महिलांनी पालखी खांद्यावर घेतली होती. मुंजोबा मित्र मंडळाने ‘कृष्णरथ’ साकारला होता. कानिफनाथ झांज पथकाने वादन केले. गावडे कॉलनी मित्र मंडळाने ढोल ताशाच्या दणदणाटात बाप्पाला निरोप दिला. चिंचवडगावातील मोरया मित्र मंडळाने शंकराची प्रतिकृती साकारली होती. लोंढेनगर येथील आदर्श तरुण मित्र मंडळाने क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावल्या होत्या आणि फुलांची सजावट केली होती. त्यानंतर नवतरुण मित्र मंडळाचे मिरवणूक चौकात आगमन झाले. मंडळाने ‘बालाजी रथ’ साकारला होता. नवभारत मित्र मंडळाने नेत्रदिपक फुलांची आरस देखावा सादर केला. श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘बालाजी रथ’ साकारला होता. या मंडळाच्या वतीने प्रथमच नुकत्याच झालेल्या ओनम सणानिमित्त वाजविण्यात येणारे केरळाचे वाद्यवृंदाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मानाचा गणपती असलेल्या अष्टविनायक मंडळांच्या मिरवणुकीचे चौकात आगमन झाले. मंडळाने शंकराची पिंड साकारली होती. गावडे पार्क मित्र मंडळाने लक्षवेधक ‘सुवर्णरथ’ साकारला होता. श्रीमान महासाधू मोरया गोसावी मित्र मंडळाने ‘विठ्ठलरथ’, विद्युत रोषणाई साकारली होता. ओम साई मित्रमंडळाने भंडार्‍याची मुक्तपणे उधळण केली.

नवनाथ मंडळाच्या मिरवणुकीत ज्ञाप्रबोधिनीच्या मुलींच्या ढोल ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. समता तरुण मंडळाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देखावा साकारला होता. शिवाजी उदय मंडळाने हिमालयाची पर्वत प्रतिकृती साकारली होती. समर्थ कॉलनी मित्र मंडळाने विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केली होती. मयुरेश्वर मित्र मंडळाने ‘शिवरथ’ साकारला होता. रथामध्ये मनमोहक शंकराची मूर्ती होती. बारा वाजता चौकात आलेल्या एम्पायर एस्टेट मित्र मंडळाची विठ्ठलाची भव्य प्रतिकृती गणेश भक्तांचे लक्ष्य वेधून घेत होती. बारानंतर आलेले मंडळांची तसेच, मंडपाची ध्वनी व्यवस्था पोलिसांनी बंद केल्यामुळे 12 नंतर येणारे उत्कृष्ट मित्र मंडळ शांततेत विसर्जन घाटाकडे रवाना झाले. रात्री बारा वाजेपर्यंत 35 हून गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. काही घरगुती, नागरिकांनी मोरया गोसावी मंदिर परिसरात गणेश मूर्तीचे विसर्जन केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह समवेत त्याच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!