ताज्या घडामोडी

साईबाबा एम्प्लॉईज’च्या महिला सभासदांची रुग्णसेवा प्रेरणादायी

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )

साईबाबा संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या महिला सभासदांनी रुग्णांची सेवा करून त्यांना आधार दिला. या प्रेरणादायी कार्याचा गौरव म्हणून सोसायटीच्या वतीने त्यांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सत्कार करणे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
साईबाबा संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट कोऑपरेटीव्ह सोसायटीच्या वतीने मकर संक्रांत, हळदी कुंकू तसेच कोविड योद्धा महिलांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्रीमती विखे बोलत होत्या. याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. संस्थेच्या चेअरमन श्रद्धाताई कोते, उपाध्यक्ष दिनेश कानडे, संचालक यादव कोते, प्रतापराव कोते, तुषार शेळके, जितेंद्र गाढवे, विलास गोंदकर, विठ्ठल पवार, मिरा कोटकर, दीपक धुमसे, संदीप बनसोडे, तज्ज्ञ संचालक निर्मला सलगरकर, सचिव नबाजी डांगे, सहसचिव विलास वाणी आदी उपस्थित होते.
यावेळी संचालक तुषार शेळके यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. श्रद्धाताई कोते यांनी प्रास्ताविक – केले. त्यात त्यांनी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने संस्था राबवत असलेल्या उपक्रमांची आणि आर्थिक स्थितीची माहिती दिली.
यावेळी श्रीमती बानायत यांनी महिलांसाठी हळदी कुंकू तसेच महिला कोविड योद्ध्यांचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी स्मिता आहेर, रश्मी दंडवते, पौर्णिमा गुजर, सुरेखा शेळके, प्रिया गोंदकर, दुर्गा किसवे, डॉ. सुनिता कडू, डॉ. मैथिली पितांबरे उपस्थित होत्या. महिलांच्या मनोरंजनासाठी पुणे येथील निलेश पापत यांचा ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सूत्रसंचालन स्वाती म्हस्के यांनी केले. आभार प्रताप कोते यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!