ताज्या घडामोडी

एमआरआरकेएस चषक क्रिकेट: कस्तुरबा हॉस्पिटल उपांत्य फेरीत

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी – बाळ तोरसकर

मुंबई, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ-‘एमआरआरकेएस’ रौप्य महोत्सवी चषक आंतर  हॉस्पिटल  टी-२० क्रिकेट स्पर्धेत कस्तुरबा हॉस्पिटलने रिलायन्स हॉस्पिटल – नवी मुंबई संघाचा २९ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दीपक लोहारेची (४५ चेंडूत ४१ धावा, १ षटकार व १ चौकार) दमदार फलंदाजी व अंकुश जाधवची (१२ धावांत ३ बळी) फिरकी गोलंदाजी, यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलचा विजय सोपा झाला. मिल्टन लोबोची (६ चेंडूत १७ धावा, १ षटकार व २ चौकार) धडाकेबाज फलंदाजी रिलायन्स हॉस्पिटलचा पराभव टाळू शकली नाही. कामगार नेते सचिनभाऊ अहिर व एमआरआरकेएसचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप यांनी स्पर्धेचे शिवाजी पार्क मैदानात आयोजन केले आहे.

रिलायन्स हॉस्पिटल विरुध्द कस्तुरबा हॉस्पिटल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. रिलायन्स हॉस्पिटलचे मध्यमगती गोलंदाज अब्दुल अन्सारी, प्रथमेश वीर, प्रतिक शेलार, अजित गिरी यांनी प्रत्येकी एक बळी घेत कस्तुरबा हॉस्पिटलच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या रचू दिली नाही. तरीही दीपक लोहारे (४१ धावा) व रोहन जाधव (१४ धावा) यांनी उत्तम फलंदाजी केल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलने ५ बाद ९३ धावांचा पल्ला गाठला. विजय आटोक्यात असतांना देखील मिल्टन लोबो (६ चेंडूत १७ धावा) व संदेश चव्हाण ( ८ चेंडूत नाबाद ११ धावा) यांचा अपवाद वगळता रिलायन्सची फलंदाजी गडगडली. फिरकी गोलंदाज अंकुश जाधव (१२ धावांत ३ बळी), डॉ.परमेश्वर मुंडे (१४ धावांत १ बळी) व मध्यमगती गोलंदाज रोहन ख्रिस्तियन (११ धावांत २ बळी), सुनील शिंदे (९ धावांत २ बळी), सुदर्शन गुट्टे (१४ धावांत १ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीमुळे रिलायन्स हॉस्पिटलचा डाव १४ व्या षटकाला सर्वबाद ६४ धावसंख्येवर संपुष्टात आला. दीपक लोहारेने सामनावीर तर मिल्टन लोबोने रिलायन्स हॉस्पिटलचा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत स्विकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!