ताज्या घडामोडी
ओंकार बेंदरे यांचा विराज नाईक यांच्या हस्ते सत्कार
शिराळा प्रतिनिधी
शिवरवाडी (ता. शिराळा) येथील ओंकार नामदेव बेंदरे या युवकाची भारतीय नौदलात ज्युनिअर कमिश्नर ऑफीसर म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते झाला. या वेळी बाजार समितीचे संचालक नामदेव बेंदरे, वृद्ध व कलाकार मानधन कमिटीचे सदस्य अनंत सपकाळ, माजी सरपंच गणेश देसाई, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, सचिन देसाई, राजेंद्र बोबडे, पोपट बेंदरे, श्रीकांत पाळेकर आदी उपस्थित होते.